
दै चालु वार्ता वृत्तसेवा
मुंबई : डान्सर म्हणून करिअरची सुरुवात करणाऱ्या प्रभूदेवाचं नाव आजही जगातील टॉप कोरिओग्राफर्समध्ये घेतलं जातं. तो उत्तम अभिनेता आणि दिग्दर्शकही आहे.पण आता लवकरच प्रभूदेवा मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.
अभिनेता, दिग्दर्शक आणि अफलातून डान्सर अशी प्रभूदेवाची ओळख आहे.
प्रभूदेवा हा गेल्या काही काळापासून मोठ्या पडद्यापासून दूर आहे. तो अनेकदा कॅमेऱ्याच्या मागे डान्स कोरिओग्राफ करताना दिसतो. मात्र आता तो चक्क कॅमेऱ्यासमोर झळकणार आहे. विशेष म्हणजे त्याच्या आगामी चित्रपटाचे नावही समोर आलं आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिग्दर्शक आशिष दुबे यांच्या ‘जर्नी’ या चित्रपटात प्रभुदेवा आपले अभिनय कौशल्य दाखवताना दिसणार आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण येत्या वर्षात म्हणजेच २०२२ मध्ये सुरु होणार आहे. या चित्रपटाचे बहुतांश चित्रीकरण हे आग्रा आणि युरोपमध्ये केले जाणार आहे.
या चित्रपटाची निर्मिती अंजुम रिझवी आणि आशिष दुबे हे दोघे करत आहेत. अंजुम रिझवी फिल्म कंपनी, मॅड फिल्म इंटरटेनमेंट आणि स्टॅग फिल्म्स इंटरटेनमेंटद्वारे हा चित्रपट निर्मित केला जात आहे. दरम्यान ‘जर्नी’ हा चित्रपट प्रेमकथेवर आधारित असेल.
बॅकग्राऊंड डान्सर म्हणून करिअरची सुरुवात करणारा प्रभूदेवा आज जगातील सर्वोत्कृष्ट कोरिओग्राफरपैकी एक मानला जातो. बॅकग्राऊंड डान्सर म्हणून करिअरची सुरुवात करणारा प्रभूदेवा आज जगातील सर्वोत्कृष्ट कोरिओग्राफरपैकी एक मानला जातो. प्रभूदेवाने चित्रपट सृष्टीतील अनेक मोठ्या कलाकारांच्या डान्सची कोरिओग्राफी केली आहे. त्याला दोन वेळा सर्वोत्कृष्ट कोरिओग्राफरचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता. बॉलिवूड तसेच तमिळ, तेलुगु, मल्याळम आणि कन्नड सिनेसृष्टीत त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे.