
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा
नवी दिल्ली : टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याला भेटण्यासाठी चाहत्यानं मैदानावर शिरण्याचे धाडस केले होते.त्यानं रोहितचा पाय पकडण्याचा प्रयत्न केला. कोरोना व्हायरसचं संकट अजूनही पुर्णपणे गेलेले नसताना चाहत्याच्या या धाडसानं मैदानावरील खेळाडूही थोडेसे घाबरले. रोहितनं त्या चाहत्याला दूरच राहण्याचा इशारा केला.
भारतीय गोलंदाजांनी कमालीची कामगिरी करताना फ्रंटसिटवर बसलेल्या न्यूझीलंडच्या संघाला बॅकफूटवर फेकले. मार्टीन गुप्तील ( ३१), डॅरील मिचेल ( ३१), ग्लेन फिलिप्स ( ३४), मार्क चॅपमॅन ( २१) आणि टीम सेइफर्ट ( १३) यांनी योगदान दिले. भारताचा फिरकीपटू आर अश्विन यानं त्याच्या चार षटकांत १९ धावांत १ विकेट घेतली. हर्षलनं २५ धावांत २ विकेट्स घेतल्या. भुवनेश्वर कुमार, दीपक चहर आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.न्यूझीलंडनं ६ बाद १५३ धावा केल्या.
प्रत्युत्तरात भारतानं १७.२ षटकांत हे लक्ष्य पार केले. रोहित शर्मा व लोकेश राहुल यांनी अर्धशतकी खेळी केली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी ११७ धावा जोडल्या. लोकेश ४९ चेंडूंत ६ चौकार व २ षटकारांसह ६५ धावा केल्या, तर रोहित ३६ चेंडूंत १ चौकार व ५ षटकारांसह ५५ धावांवर बाद झाला.