
दैनिक चालू वार्ता
प्रतिनिधी मोखाडा
अनंता टोपले
शासकीय माध्य व उच्च माध्य आश्रम शाळा पळसुंडे ता. मोखाडा जि. पालघर येथे आजादी का महोत्सव अंतर्गत भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त जनजातीय गौरव दिवस दि.१५ नोव्हेंबर ते २२ नोव्हेंबर २०२१ या कालावधीत विविध कार्यक्रमाचे आयोजन करून उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला जात आहे.
भारतीय आदिवासी क्रांतिकारक बिरसा मूंडा यांना १५ नोव्हेंबर रोजी त्यांच्या जयंतीनिमित्त मानवंदना देण्यात आली. दि. १७ नोव्हेंबर रोजी शालेय स्तरावर चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, आोजित करण्यात आल्या स्पर्धेचे विषय आदिवासी कला व संस्कृती यावर आधारित होते. मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभागी होऊन आदिवासी कला व संस्कृती जतन करण्यासाठी निर्धार केला.
त्यामध्ये प्रामुख्याने तारपा नुत्य, दृश्याचे सादरीकरण नेत्रदीपक होते. संपूर्ण परिसर उत्साहात आणि आनंदात जल्लोषात, घोषणांनी दुमदुमला होता .शाळेच्या विद्यार्थ्यांचे परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे. कार्यक्रमासाठी शाळेचे प्राचार्य. पी.एम राठोड , सुरेश भांगरे सर ,कला शिक्षक रत्नाकर टोकरे व इतर शिक्षक वृंद यांनी विशेष परिश्रम मेहनत घेतली सर्व विद्यार्थी, शिक्षक मास्क परिधान करून होते हे विशेष. कोव्हीड मार्गर्शनाखालीच तत्वाचे पूर्णपणे पालन करण्यात आले.कार्यक्रमासाठी माननीय प्रकल्प अधिकारी आयुषी सिंह मॅडम यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.