
स्वच्छ सर्वेक्षणात सलग तिसऱ्यांदा भारतात पन्हाळा ठरले Best City in Innovations and Best Practices
दैनिक चालू वार्ता
कोल्हापूर प्रतिनिधी ,शहाबाज मुजावर
दिनांक 20 नोव्हेंम्बर 2021 रोजी विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे भारताचे मा.राष्ट्रपती यांच्याद्वारे स्वच्छ सर्वेक्षण 2021 चे निकाल घोषीत करण्यात आले. यावेळी केंद्रीय शहर विकास व आवास मंत्री श्री हरदीप सिंग पुरी उपस्थित होते.पन्हाळा नगरपरिषदने पुन्हा एकदा स्वच्छतेच्या कामगिरीत सातत्य राखत शहराचे नाव देशात उंचावले आहे.यावेळी पन्हाळा शहरास Innovation and Best practices या प्रकारात देशातील सर्वोत्तम शहर चा पुरस्कार मिळाला. पन्हाळा नगरपरिषद च्या नगराध्यक्षा रुपाली रवींद्र धडेल, मुख्याधिकारी स्वरूप खारगे, नगरसेविका तेजस्विनी गुरव, श्री रवींद्र धडेल व अजित चौरे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
पन्हाळा शहराने स्वच्छ सर्वेक्षण 2018 पासून सलग सातत्याने आपली कामगिरी उंचावत शहराचा नावलौकिक वाढवला आहे. पन्हाळा शहरास सलग तिसऱ्यांदा 3 स्टार रेटिंग हे मानाचे मानांकन प्राप्त झाले असून ODF ++ हा दर्जा मिळाला आहे. स्वच्छ सर्वेक्षण 2021 मध्ये पश्चिम विभाग दुसरा व देशात 10 वा क्रमांक पटकवण्यात पन्हाळा शहर यशस्वी ठरले आहे. याप्रसंगी मुख्याधिकारी स्वरूप खारगे यांनी सांगितले, पन्हाळा शहराच्या स्वच्छतेत सातत्य राखण्यासाठी नेहमीप्रमाणे शहरातील नागरिक व नगरपरिषद सफाई कर्मचारी यांचे मोलाचे कार्य आहे. तसेच सर्व नगरसेवकांनी दिलेल्या सहकार्यामुळे हा पुरस्कार मिळवण्यात यश मिळाले आहे.पन्हाळा नगरपरिषद च्या नगराध्यक्षा सौ रुपाली रवींद्र धडेल यांनी बोलताना सांगितले की शहरातील नागरिक व सफाई कर्मचाऱ्यांच्या अविरत मेहनती मुळे सलग चोथ्यांदा पन्हाळा शहराचे नाव देशात उंचावले आहे. पन्हाळा शहराने मिळवलेल्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत असून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.