
पन्हाळ्यातील मोकाशी गटाचे नगरसेवक सतेज पाटील यांच्या पाठीशी तर चौदा नगरसेवकांचा पाठिंबा भाजपला
दैनिक चालू वार्ता
कोल्हापूर प्रतिनिधी ,शहाबाज मुजावर
पन्हाळा नगरपालिकेतील मोकाशी गटाच्या नगरसेवकांनी पालकमंत्री सतेज पाटील यांची भेट घेवून त्यांना पाठींबा दिला. त्याचबरोबर पन्हाळा विकास आघाडीच्या नगरसेविका विना बांदीवडेकर यांनीही ना. पाटील यांना पाठींबा दिला आहे.
विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगरसेवकांच्या गाठीभेटींना जोर आला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार सतेज पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व मतदारांशी संपर्क साधून प्रचार मोहीम गतिमान केली आहे. या पार्श्वभूमीवर पन्हाळ्यातील मोकाशी गटाच्या पाठींब्याबद्दल उत्सुकता होती. शिवशाहू आघाडी मोकाशी गटाच्या आसिफ मोकाशी, संध्या पोवार, मिनाज गारदी या नगरसेवकांनी ना. सतेज पाटील यांची भेट घेवून त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. ना. पाटील यांच्या कामाची पध्दत, विकासाची दृष्टी व सततचा संपर्क यामुळे आम्ही त्यांच्या पाठीशी राहण्याचा निर्णय घेतल्याचे नगरसेवक आसिफ मोकाशी यांनी सांगितले. या नगरसेवकांच्या बरोबरच पन्हाळा विकास आघीडीच्या नगरसेविका विना बांदिवडेकर यांनी सुध्दा ना. पाटील यांनाच आमचे पाठबळ असल्याचे सांगितले. याचर्चेवेळी बोलताना ना. सतेज पाटील म्हणाले की, गेल्या 6 वर्षाच्या काळामध्ये जिल्ह्यातील सर्व भागाला निधी दिला आहे. त्याचबरोबर या मतदारांच्या सुखदु:खात सहभागी झालो आहे. पन्हाळ्यातील नगरसेवकांनी माझ्यावर टाकलेला विश्वास येणाऱ्या काळात नक्कीच सार्थ ठरवेन. तसेच जनसुराज्य या पक्षाने माननीय आमदार विनय रावजी कोरे यांनी भाजप ला पाठिंबा दिल्यामुळे जनसुराज्य पक्षाचे 14 नगरसेवक व एक नगराध्यक्ष यांनी भाजपला मदत करण्याचे ठरवले आहे तसेच एक नगरसेवक मयत आहेत व यास्मिन उमर फारूक मुजावर या नगरसेविका शिवसेनात 2 महिन्या मागे प्रवेश केला होता त्यामुळे त्यांचा पाठिंबा पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांना असेल असे पन्हाळगडावर च्या नगरपरिषद चे चित्र निर्माण झाले आहे
यावेळी माजी नगराध्यक्ष जितेंद्र पोवार, मिलिंद बांदिवडेकर, आलमगीर गारदी, माजी नगरसेवक सतीश भोसले उपस्थित