
दैनिक चालू वार्ता
मोखाडा प्रतिनिधी
अनंता टोपले
वाशाळा ता.मोखाडा येथे महादेव कोळी समाज उन्नती मंडळ महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीने आयोजित संयुक्त जयंती व वाघबारस कार्यक्रमात ते बोलत होते.
महादेव कोळी समाजाच्या या कार्यक्रमात तरुण पिढीच्या नव्याने पदवी प्राप्त केलेल्या वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यंशवत विद्यार्थी,क्रिडा क्षेत्रातील यशस्वी खेळाडू यांना सन्मानित करण्यात आले.श्री प्रदीप वाघ यांनी मार्गदर्शन करताना समाजा साठी योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान केला पाहिजे.व तरुणांना सहकार्य केले पाहिजे असे आवाहन केले.समाजा समोर असणार्या समस्या सोडविण्यासाठी सर्वांना एकत्र येऊन काम करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.
यावेळी समाज उन्नती मंडळाचे श्री प्रदीप वारघडे, किशोर स्वारी,अजय शेळकंदे,अमोल मोकाशी, तुषार फाळके, रघुनाथ पाटील,कमळाकर डामसे, विजयराव मुकणे, नरेंद्र मुकणे, जयराम वाघ, संजय वाघ, विठ्ठल गोडे,भुषण फाळके, राहुल झिंजुर्डे, नरेश घाणे,कमळाकर डामसे, यांनी विशेष परिश्रम घेतले.यावेळी समाज उन्नती मंडळाचेश्री मगन पाटील, श्री भरत गारे गुरुजी,खोडे गुरुजी जयराम गवते, श्री भवारीविश्वस्त, कार्यकारी मंडळाचे सदस्य व तरुण व महीला सदस्य उपस्थित होते.राजकीय मान्यवर श्रीमती कुसुम झोले, श्री प्रदीप वाघश्री दिलीप गाटे, मधुकर डामसे, सरपंच भवारी , मिलिंद झोले तसेच जव्हार मोखाडा वाडा विक्रमगड तालुक्यातील अनेक लोकप्रतिनिधी उपस्थित होते.श्री अमोल मोकाशी यांनी सुत्रसंचलन केले, श्री प्रदीप वारघडे सरचिटणीस यांनी प्रास्ताविक केले व श्री भुषण फाळके यांनी आभार मानले.