युवा नेते राष्ट्रवादी तालुका सचिव यांचे प्रतिपादन
अजय चव्हाण दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी
गत 15 वर्षांपासून समाजकारण व राजकारण करीत अनेक गोर गरीब दिन दुबळे, असहाय यांना सर्वांगीण पद्धतीने विकास करणारे युवा नेतृत्व राष्ट्र वादी काँग्रेस पार्टी चे तालुका सचिव अभिजित राठोड हे वानोळा सर्कल मधून जि. प.निवडणूक लढवावी अशी मागणी युवक व नागरिकांतून होत आहे.
अभिजित राठोड यांना स्व. दत्तरामजी राठोड मा. जि. प. सदस्य यांचा राजकीय वारसा लाभला असून ते जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील असतात, वानोळा ग्रामपंचायती मध्ये त्यांनी सलग 15 वर्षे जनसेवा केली असून वानोळा सर्कल मधील सर्व गावामध्ये त्यांची नाळ जोडलेली असून त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे.
लोकनेते मा. आ. प्रदीप नाईक यांनी युवा नेतृत्व अभिजित राठोड यांना उमेदवारी देवून वानोळा सर्कल चा सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करतील अशी अपेक्षा आहे.
अभिजित राठोड यांनी घरकुल, संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ वृद्धापकाळ योजना, अनेक सामाजिक कार्यक्रम राबवून जनसेवा केली आहे, त्यात सर्व इच्छूक उमेदवार एकच गावचे असल्याने मा. आ. प्रदीप नाईक हे अभिजित राठोड यांना उमेदवारी देवून वानोळा सर्कल का न्याय निवलून देईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
वानोळा गावचे दिवंगत शिक्षण महर्षी, आरोग्य ची सेवा उपलब्ध करून देणारे मा. जि. प. सदस्य दत्तराम जी राठोड यांचा राजकीय वारसा लाभलेले अभिजित राठोड हे वानोळा सर्कल चा सर्वांगीण विकास करणारे एकमेव नेते आहेत अशी भावना सर्व सामान्य जनतेत आहे.
गत वर्षी राष्ट्र वादी काँग्रेस पार्टी ला पराभव स्वीकारावा लागला, आगामी निवडणुकीत विजय मिळविण्यासाठी अभिजित राठोड यांना उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी सर्व कार्यकर्त्यातून होत आहे.