दै चालु वार्ता वृत्तसेवा
मुंबई :शिखर धवन धडाकेबाज सलामीवीर शिखर धवनला टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या हिंदुस्थानी संघात स्थान मिळाले नाही. शिखर धवनने आयपीएलमध्ये जबरदस्त फलंदाजी केली होती. शिवाय श्रीलंका दौऱयावरही त्याने चांगली कामगिरी केली होती. आयपीएलच्या १४व्या हंगामात आतापर्यंत सर्वाधिक ३८० धावा याच शिखर धवनच्या नावावर आहेत. आयसीसी च्या स्पर्धेतही त्याने चांगली कामगिरी केलेली आहे. मात्र तरीही त्याची टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी टीम इंडियात निवड होऊ शकली नाही.तसेंच क्रिकेट जगतात यार्कर किंग नावाने प्रसिद्ध असलेल्या लसिथ मलिंगाला टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी श्रीलंकेच्या संघात स्थान न मिळाले नाही. त्यामुळे या वेगवान गोलंदाजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.मात्र लसिथ मलिंगाप्रमाणेच हिंदुस्थानच्या शिखर धवनसह अनेक दिग्गजांना टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी आपापल्या संघात स्थान मिळालेले नाही.
कार्लोस : २०१६च्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडच्या बेन स्टोक्सला अखेरच्या षटकात सलग चार षटकार ठोपून वेस्ट इंडीजला जग्गजेता बनविणाऱया कार्लोस ब्रेथवेटला यंदाच्या टी-२० विश्वचषक संघात स्थान मिळाले नाही. कार्लोस ब्रेथवेटसारख्या आक्रमक खेळाडूची निवड न झाल्याने क्रिकेटप्रेमींना मोठे आश्चर्य वाटले. दुसरीकडे ३६ वर्षीय रवी रामपॉलचे सहा वर्षांनंतर विंडीजच्या संघात पुनरागमन झाले आहे.
अँलेक्स पॅरी : क्रिकेट ऑस्ट्रेलियाने टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी निवडलेल्या संघात एकही आंतरराष्ट्रीय सामना न खेळलेल्या जोश इंग्लिसला स्थान दिले. मात्र अँलेक्स पॅरीला डावलून या नव्या खेळाडूची केलेली निवड आश्चर्यकारक ठरली.
शोएब मलिक : पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझमने अनुभवी शोएब मलिका टी-२० विश्वचषक संघात स्थान मिळवून देण्यासाठी खूप प्रयत्न केले. मात्र टी-२० क्रिकेटमध्ये पाकिस्तानसाठी सर्वाधिक १०८०२ धावा फटकावणाऱया या खेळाडूला टी-२० संघात स्थान मिळाले नाही. शोएब मलिक सध्या फॉर्ममध्येही नव्हता. त्याचा त्याला फटका बसला. मलिकने सप्टेंबर २०२०मध्ये पाकिस्तानसाठी अखेरचा सामना खेळला होता.