
दै चालु वार्ता वृत्तसेवा
नवी दिल्ली : पंतप्रधान मोदी यांनी शुक्रवारी वादग्रस्त कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली.चीनने भारताचा भूभाग बळाकावल्याचे सत्यही केंद्र सरकारने मान्य करावे, अशी मागणी करीत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी, सीमेवरील परिस्थिती हाताळण्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शनिवारी पुन्हा लक्ष्य केले.
त्यानंतर शनिवारी राहुल गांधी यांनी चीनच्या कथित घुसखोरीप्रकरणी पंतप्रधानांवर टीका केली आणि चीनने भारतीय भूमी बळकावल्याचे सत्य सांगण्याचे आव्हान दिले.
तसेंच चीन सीमेवरील परिस्थिती हाताळण्यात मोदी सरकार कमी पडले असून त्याने देशाच्या प्रादेशिक एकात्मतेशी तडजोड केल्याचा आरोपही राहुल यांनी केला. शेतकरी आणि विरोधी पक्षांची कृषी कायदे मागे घेण्याची मागणी मोदी सरकारने मान्य केली, त्याप्रमाणेच चीनने भारतीय भूभाग बळकावल्याचे सत्यही आता मान्य करावे, असे ट्वीट संदेशात राहुल यांनी म्हटले आहे.