
दै चालु वार्ता वृत्तसेवा
मुंबई: भाजपनं महाराष्ट्रातील नेते विनोद तावडे यांना महाराष्ट्रासाठी राष्ट्रीय महामंत्री करत असल्याचं जाहीर केलं आहे.भाजप अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांनी आज काही संघटनात्मक नियुक्त्या केल्या आहेत.
याशिवाय बिहारसाठी ऋतुराज सिन्हा, झारखंडसाठी आशा लाकडा यांची राष्ट्रीय मंत्री म्हणून नियुक्ती केली आहे. पश्चिम बंगालसाठी भारती घोष यांची राष्ट्रीय प्रवक्ता म्हणून आणि शहजाद पुनावाला यांची राष्ट्रीय प्रवक्ता म्हणून नियुक्ती केली आहे. भाजपचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांनी यासंदर्भात घोषणा केली आहे. .
त्यानंतर ते काही काळ बाजूला गेल्याचं चित्र निर्माण झालं होतं. त्यानंतर विनोद तावडे यांचा राष्ट्रीय कार्यकारिणीत समावेश केल्यानंतर त्यांच्याकडे हरियाणाचे प्रभारी म्हणून जबाबदारी देण्यात आली होती. आता त्यांना महाराष्ट्रासाठी राष्ट्रीय महामंत्री करत भाजपनं पुन्हा एकदा बळ देण्याचा प्रयत्न केल्याचं बोललं जातंय. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विनोद तावडे यांची नियुक्ती महत्त्वाची असल्याचं बोललं जातंय.