
दैनिक चालू वार्ता
प्रतिनिधी मुक्ताईनगर
मुक्ताईनगर: आज वंचित बहुजन आघाडीच्या वतिने 5%मुस्लिम आरक्षणाची अंमलबजावणी करण्या करीता मा तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले.
न्यायालयाने मान्यता दिलेल्या 5%मुस्लिम शैक्षणिक आरक्षण सरकार लागु करत नाही आहे. ते तत्काळ लागु करण्या करीता वंचित बहुजन आघाडीने 5 जुलै 2021रोजी विधान भवनावर मोर्चा काढला होता व मा मुख्यमंत्री ऊध्दवजी ठाकरे यांच्या पर्यत निवेदन पोहचविण्यात आले होते पन आता पर्यत त्या आरक्षणाची सरकार अंमलबजावणी करत नाही आहे .त्यामुळे संपुर्ण महाराष्ट्र भर आ राष्ट्रिय अध्यक्ष ,मा खा श्रध्येय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर व प्रदेश अध्यक्षा रेखाताई ठाकुर यांच्या आदेशानुसार संपुर्ण महाराष्ट्राभर आंदोलन करण्यात आले त्याचाच भाग म्हनुण मुक्ताईनगर तहसिल येथ मा तहसिलदार मॅडम यांना मागण्याचे निवदन देण्यात आले.निवेदणातिल मागण्या
१)न्यायालयाने मान्यता दिलेले 5% मुस्लिम शैक्षणिक आरक्षण तत्काळ लागु करण्यात यावे.
२)धार्मिक भावना भडकावुन समाजात तेढ निर्मान करणा-यानां कठोर शिक्षा देणारे मोहम्मद पैगंबर बिल वंचित बहुजन आघाडीने सुपुर्त केले आहे, ते बिल येणा-या हिवाळी अधिवेशनात मंजुर करून तत्काळ तो कायदा लागु करावा.
३)महाराष्ट्र वक्फ बोर्डाच्या मिळकती मध्ये वाढ करून इमाम ,मुअज्जिन आणी खुद्दाम हजरत यांना मासिक वेतन सुरू करण्यात यावे .
४)संत विचारांचा प्रचार प्रसार करना-या ह भ प किर्तनकार यांना मासिक वेतन सुरू करण्यात यावे.५)वक्फ बोर्डाच्या जमिनीवर झालेले अवैध कब्जे हटऊन त्या जागेचा अल्पसंख्याक समाजाच्या ऊन्नतीसाठी ऊपयोग करावा.
६)सारथी-बार्टि -महाज्योती प्रमाणे मुस्लिम अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यान साठी स्वतञ प्रशिक्षण संस्थेची स्थापना करावी जेणेकरून मुस्लिम अल्पसंख्याक समाज सुध्दा मुख्य प्रवाहात येईल अशा विवी ध मागण्या करीता आज वंचितने निवेदन देले .निवेदन देतांना ता महासचिव, डी डी पोहेकर, ता कोषाध्यक्ष ,वसंत लहासे ,गोपाळ धुंदले,ता संघटक माणिकराव इंगळे,सुनिल धुरंधर ,कमलाकर तायडे ,साबिर खान अब्बास खान ,जेष्ठ नेते एस,टी हिरोळे, कमलाकर तायडे, मिलीद वाघ ,शंकर इंगळे,सादिल खॉ अब्बास खॉ,गणेश सोनवणे आणि सम्यक विद्यार्थी आंदोलन मा राज्य सदस्य शुभम आसलकर ऊपस्थित होते.