
दैनिक चालू वार्ता,
जव्हार,प्रतिनिधी,
दिपक काकरा.
जव्हार:- दिगवंत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ९ व्या पुण्यतिथी निमित्ताने शिवसेना जव्हार शाखेच्या वतीने जव्हारच्या पतंगशहा कुटीर रुग्णालय येथे रुग्णांना फळ वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला.बाळासाहेबांची शिकवण होती २० टक्के राजकारण आणि ८० टक्के समाजकारण हा उद्देश डोळ्या समोर ठेवून शिवसेनेचे जव्हार शहर प्रमुख परेश पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली गरीब गरजू व गरोदर मातांना फळ वाटप करण्यात आले,या वेळी पतंगशहा कुटीर रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.रामदास मराड,जव्हार पंचायत समितीचे उप सभापती चंद्रकांत रंधा,जव्हार नगर परिषदेचे नगराध्यक्ष चंद्रकांत पटेल,शिवसेनेचे जव्हार उपशहर प्रमुख साईनाथ नवले,उप तालुका प्रमुख अनंत घोलप,आरशद कोतवाल,कुंजय तामोरे,आसिफ घाची,अभिषेक यादव,नदीम चाबुकस्वार,साजिद सय्यद,इसरारअली सय्यद तसेच महिला आघाडीच्या महिला पदाधिकारी व शिवसैनिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.