दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा
हिमायतनगर -तालुक्यातील जि.प.प्राथमिक शाळा,सिरपल्ली केंद्र-सिरंजनी ता.हिमायतनगर जि.नांदेड शाळेत मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सव वर्षा निमित्त ” खरी कमाई ” या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांचा ” बाल आनंद मेळावा ” दि. 20/01/2023 मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. संतोष जाधव यांच्या हस्ते प्रतिमा पुजन व फित कापुन करण्यात आली. शाळेतील 40 विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन विविध प्रकारच्या पदार्थांची दुकाने लावली होती. तसेच गावातील नागरीकांनी आनंद मेळाव्याला भेट देऊन पदार्थांचा मनमुराद आस्वाद घेतला. या उपक्रमातून 2519 रूपयांची आर्थिक उलाढाल झाली. यात शुभम सुदर्शन पवार (वर्ग-2रा) यांनी 560 ₹. कमाई करून प्रथम क्रमांक मिळविला तर प्रतिक पांडूरंग जाधव (वर्ग-1ला) यांनी 203 ₹. कमाई करून द्वितीय क्रमांक मिळविला आणि तनुजा पंडित जाधव(वर्ग-4था) हिने 200 ₹. कमाई करून तृतीय क्रमांक मिळविला.
” खरी कमाई ” या उपक्रमातंर्गत ” बाल आनंद मेळावा ” आयोजित करण्यामागचा मुख्य हेतू म्हणजे विद्यार्थ्यांना शाळेची व अभ्यासाची गोडी लागावी. विद्यार्थ्यांना नफा, तोटा, खरेदी-विक्री, कमी-जास्त, नाणी-नोटा याचे ज्ञान व्हावे. विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान अवगत व्हावे. विद्यार्थ्यांमध्ये सहकार्याची भावना निर्माण व्हावी. विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्व कळावे. विद्यार्थी – शिक्षक नात्यामध्ये आपुलकी निर्माण व्हावी. विद्यार्थ्यांना भविष्यात आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवने हे या उपक्रमाचे मुख्य हेतु आहेत.
बाल आनंद मेळाव्यात जवळपास 30 स्वादिष्ट पदार्थाचा समावेश होता यात आप्पे, ईडली, समोसे, गाजर हलवा, वडापाव, गुलाबजामुन, खिचडी, भज्जे, पापड, नरडे, चिवडा, मुरमुरे, पोहे, पकोडे, मटकी, उसळ, चन्ने, पेढे, बर्फी, मुरमुर्याचे गोड लाडू , चकली, पुरीभाजी अशा अनेक पदार्थांचा समावेश यात होता.
कार्यक्रमला शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. संतोष जाधव, प्रतिष्ठित नागरिक श्री. मिलिंद पाटील जाधव,माजी अध्यक्ष श्री. प्रभाकर जाधव,शिक्षण प्रेमी सदस्य सुदर्शन पवार, परमेश्वर जाधव, अनिल जाधव, नंदकिशोर पवार, विकास जाधव, पुंडलिक जाधव, अवधुत जाधव, पंडित जाधव, कैलास जाधव, नारायण जाधव, जयानंद जाधव, रविकांत जाधव, संतोष जाधव, सुनिल तिरमलदार, मनोज जाधव,सटवा जाधव, विनोद जाधव व शाळा व्यवस्थापन समिती सर्व सदस्य उपस्थित होते.
कार्यक्रमच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक श्री. गोणे एम.व्ही.व सहाशिक्षक श्री. जालने डी. एच. गावातील नागरीक, युवावर्ग यांनी पुढाकार घेतला.