दैनिक चालू वार्ता अहमदपूर ता.प्रतिनिधी-राठोड रमेश पंडित
==========================
अहमदपूर:- गोर बंजारा समाजाची मोठी ताकद असून सुद्धा बंजारा समाज अनेक विषयापासून भरकटला आहे.सकल गोर बंजारा समाजाला एकत्र आणण्यासाठी जळगाव जिल्हा जामनेर तालुक्यातील गोदरी येथे पाच दिवशीय हिंदु गोर-बंजारा, लभाना नायकडा कुंभभाचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यासाठी देशभरातून मोठ्या संख्येने समाज बांधव येणार असून महाराष्ट्र राज्य तसेच बाहेरील राज्यातील बंजारा समाजातील बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान बंजारा क्रांती दलाचे संस्थापक अध्यक्ष तथा भाजपा नेते देविदास राठोड यांनी केले आहे.
जळगाव जिल्ह्यातील गोद्री येथे गोरबंजारा कुंभमेळाचे आयोजन दिनांक 25 जानेवारी ते 30 जानेवारी 2023 पर्यंत करण्यात आले आहे. या मेळाव्यात हिंदू गोर-बंजारा,लमाना नायगडा समाजाची संस्कृती गोरबंजारा समाजाचा इतिहास,रितीरिवास,पेहराव,भाषा, साहित्य,धार्मिक स्थान, परंपरा आणि समाजात असलेले मोठ्या प्रमाणात धर्मांतर,समाजाचे दशा आणि दिशा अशा विविध विषयावर साधू, संत, महंत यांचे अनमोल मार्गदर्शन मिळणार आहेत.