
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :- अंजनगाव सुर्जी येथील जुना बस स्टॉप येथे आदित्य गणेश वंजाळे याची झोपडी नावाची चहाची कॅन्टीन आहे.तो त्या परिसरातील दुकानांना चहा जागेवर पोहचून तसेच आपल्या कॅन्टीन मधून चहाची विक्री करून घर चालवितो.जुना बस स्टॉप परिसरातील समीर बाईक सेंटर येथे चहा देऊन आदित्य ने समीर बाईक सेंटरच्या मालकाला पैसे मागितले आणि तेथे उपस्थित असलेला सैयद हुसन सैयद उस्मान याच्याकडे चहाचे उधारीचे पंचवीस रुपये मागितले असता सैयद हुसन सैयद उस्मान याने त्या दुचाकी दुरुस्ती दुकानातील डिस्कव्हर गाडीची पेट्रोल टाकी त्याला मारण्याकरता घेतली.दरम्यान त्या लोटलाटित ती टाकी आदित्यच्या चेहऱ्याच्या डाव्या बाजूला लागल्याने तो रक्तबंबाळ झाला.यासंबंधी आदित्य ने पोलीस स्टेशन गाठले.सदर घटना जुना बस स्टॉप येथे दि.२० जानेवारी २०२३ शुक्रवार रोजी सायंकाळी ०६:०० च्या सुमारास घडली.प्रकरणी पोलीसांनी झाडीपुरा येथील तक्रारकर्ता याने दिलेल्या तक्रारीनुसार शरीफ नगर येथील आरोपी सैयद हुसन सैयद उस्मान याच्या विरुद्ध तक्रार दाखल करून आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहिता १८६० नुसार कलम ३२३,५०४ अन्वये ठाणेदार दीपक वानखडे यांच्या मार्गदर्शनात गुन्हा दाखल केला.