दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी – संभाजी पुरीगोसावी
सांगली जिल्ह्यांतील खानापूर येथील जवान नायब सुभेदार जयसिंग शंकर भगत (वय ३९) यांचा लेह-लडाख भागात अतिबर्फवृष्टी झाल्याने. शहीद जयसिंग भगत यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे त्यांना चंदीगडमध्ये मिलिटरी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले .आज सकाळी उपचार दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. शहीद भगत हे मराठा लाईफ इन्फंट्रीमध्ये नायब सुभेदार पदावर होते .दरम्यान जवान भगत यांच्या पत्नीही बेळगाव येथे होत्या .त्यांना तातडीने चंदगडमध्ये बोलावून घेण्यात आले. शहीद जवान भगत यांना तीन मुली आहेत. जवान जयसिंग भगत यांचे मूळ गाव खानापूर आहे .शहीद भगत यांचे पार्थिवध्येय उद्या सकाळी मिलिटरीच्या विशेष विमानाने पुणे आणि. तिथून खानापूर येथे आणण्यात येणार आहे. त्यानंतर खानापूर ते गोरेवाडी रस्त्यावरील भगतमळा परिसरातील मातोश्री मंगल कार्यालया समोरील पटांगणामध्ये शहीद जयसिंग भगत यांच्यावर शासकीय इतामामात अंत्यसंस्कार होणार आहे. अशी माहिती नातेवाईकांनी दिली. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना.