दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी-नवनाथ यादव
भुम:- तालुक्यातील फिनिक्स इंग्लिश स्कूल पाथरूड च्या वतीने दि २१ शनिवार रोजी वुमन स्पेशल डे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमांमध्ये महिला प्रोत्साहनपर व्याख्यान ,हळदीकुंकू, मैदानी स्पर्धाचा समावेश होता.कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ज्यांनी औद्योगिक क्षेत्रात आपले वेगळी ओळख निर्माण आश्या मुमताज शेख,ग्रामसेवक रेखा हराळे व्याख्यान महिलांना प्रोत्साहन देणारे केले. त्या अनुषगाने महिलांना वेगवेगळ्या खेळात सहभाग घेऊन खेळाचा आनंद लुटला. अनेक महिलांनी, माजी शिक्षिका यांनी कार्यक्रमांमध्ये सहभाग घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली.कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन विधीतज्ञ विलास पवार, सदस्य दत्तात्रय सोनार उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वप्नाली टाळके मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन वैशाली टाळके मॅडम यांनी केले . कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक बापू खांडेकर सर तसेच सहशिक्षिका श्रीमती अर्चना खुणे मॅडम, श्रीमती पुनम बोराडे मॅडम ,कुमारी सोनाली खुणे मॅडम,श्रीमती सत्यभामा मुंडे यांनी परिश्रम केले. यावेळी विद्यार्थी पालक उपस्थित होते.