दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :- गणेशदास राठी हायस्कूलच्या वार्षिक संमेलनाचा कार्यक्रम शुक्रवार दि.२० जानेवारी २०२२ रोजी सांस्कृतीक भवनात सुरू होता.यावेळी काही समाजकंटकांनी दगडफेक केली.या दगडफेकीत पार्किंगमध्ये ठेवलेल्या मोटारसायकलींची तोडफोड केली.दरम्यान सांस्कृतिक भवनाच्या काचाही फुटल्या.घटनेची माहिती मिळताच गाडगे नगर पोलीसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले.पोलीसांनी ९ जणांना अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,सांस्कृतीक भवनात राठी हायस्कूलचे वार्षिक स्नेह संमेलन सुरू असताना १० ते १५ समाजकंटक कार्यक्रमस्थळी पोहचले.त्यांना सुरक्षा रक्षक आणि शिक्षकांनी कार्यक्रमाला उपस्थित राहण्यास नकार दिला.मग त्यांनी जबरदस्तीने आत जाण्याचा प्रयत्न केला.
त्यानंतर पार्किंगमध्ये लावलेल्या वाहनांची तोडफोड केली आणि सांस्कृतिक भवनावर दगडफेक केली.त्यामुळे सांस्कृतिक भवनाच्या काचाही फुटल्या.कार्यक्रमात सहभागी शिक्षकांनी गाडगेनगर पोलीसांना याबाबत माहिती दिली.या घटनेची माहिती मिळताच एसीपी पूनम पाटील,गाडगेनगरचे पोलीस स्टेशनचे ठाणेदार आसाराम चोरमाळे हे त्यांच्या पोलीस पथकासह संस्कृती भवनात पोहोचले.तेथून त्यांनी ९ जणांना ताब्यात घेतले.या हल्लेखोरांच्या दगडफेकीमुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.काही दिवसांपूर्वी असाच प्रकार गणेशदास राठी विद्यालयात प्रार्थनेदरम्यान घडला असून शिक्षकाला मारहाण
केले होते.त्या घटनेत गोंधळ घालणाऱ्या तरुणांचा सहभाग असल्याचे बोलले जात आहे.
—————————————-
काही तरुणांनी सांस्कृतिक भवनावर दगडफेक सुरू केली अशी माहिती मिळताच आम्ही तात्काळ पथकासह घटनास्थळी पोहोचलो.घटनास्थळावरून ९ आरोपींना अटक करण्यात आली आहे.आरोपींनी दगडफेक,सांस्कृतिक भवनाच्या काचा फोडल्या आणि पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनांची तोडफोड केली.आरोपीला अटक करून कारवाई सुरू करण्यात आली आहे.
▪️आसाराम चोरमाळे,ठाणेदार,गाडगेनगर