
दै चालु वार्ता वृत्तसेवा
मुंबई : मुंबई हायकोर्टाने दिलेल्या जामीन आदेशानुसार, आर्यन आणि अरबाज मर्चंट क्रूझवर स्वतंत्रपणे प्रवास करत होते. त्यांनी ड्रग्ज घेण्याची कोणतीही योजना आखल्याचा कोणताही पुरावा नाही. तसेच आर्यन खानच्या व्हाट्सअॅप चॅटमध्ये आक्षेप घेण्यासारखे काहीही नाही. आर्यन खानकडे कोणतेही ड्रग्ज सापडले नाहीत. अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचाकडे ड्रग्ज सापडले. ते विकण्याजोगे नव्हते. त्यामुळे प्राथमिक तपासात आर्यन, अरबाज, मुनमुन यांनी ड्रग्ज विक्रीचे षडयंत्र रचल्याचं दिसून येत नाही”, अशी माहिती मुंबई उच्च न्यायालयाने जामीन आदेशात दिली आहे. यामुळे आर्यनला दिलासा मिळाला आहे. बॉलिवूडचा किंग खान अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान हा गेल्या काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत आहे. मुंबई क्रूज ड्रग्ज पार्टी प्रकरणी आर्यनला अटक झाल्यानंतर तब्बल २८ दिवसांनी त्याची जामिनावर सुटका झाली.त्यानंतर आता याप्रकरणी मुंबई हायकोर्टाचा सविस्तर आदेश समोर आला आहे. आरोपीने हा गुन्हा करण्याची योजना आखली होती, हे स्पष्ट करणारा कोणताही पुरावा नसल्याचे हायकोर्टाने आपल्या आदेशात म्हटले आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकरणानंतर चित्रपट निर्माते संजय गुप्ता यांनी प्रतिक्रिया देत एनसीबीवर निशाणा साधला आहे.
मात्र या संपूर्ण प्रकरणानंतर चित्रपट निर्माते संजय गुप्ता ट्वीट करत एनसीबीवर निशाणा साधला आहे. संजय गुप्ता यांनी केलेल्या ट्वीटनुसार, “मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आर्यन खान निर्दोष होता आणि आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसात त्याला जे भोगावे लागले, त्याच्या कुटुंबाला जे भोगावे लागले, त्याची भरपाई कोण देणार?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.