
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी आर्णी-श्री,रमेश राठोड
;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;!!;;;;;;;;;;;!;;;;;;;;;;;;;;;;
आर्णी तालुक्यातील सावळी सदोबा परिसरातील मौजा सुभाषनगर येथे बंजारा समाजाचे कुलदैवत श्री.संत सेवालाल महाराज चरित्र लिला वाचन सप्ताहाला 8 फेब्रुवारी पासून सुरुवात होणार असून, या सप्ताहाच्या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे,15 फेब्रुवारी या सप्ताहाची सांगता होणार आहे, हरिभक्त पारायण श्री.डिगांबर महाराज यांच्या अमृतवाणीतून संत सेवालाल महाराज चरित्राचे वाचन होणार आहे,कळस स्थापना तपस्वी संत श्री.कनीराम महाराज यांच्या हस्ते होणार असून, सप्ताहाचे दिवस विविध गावातील हरिभक्त पारायण महाराजांच्या भजनाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहेत,ह.भ.प.श्री.राहुल महाराज वनोलीकर,ह.भ.प.श्री पंडित महाराज फुलउमरी ह.भ.प.श्री. श्रीराम महाराज शेदूरशनी,ह.भ.प.श्री. मोहन महाराज आंबोडा, ह.भ.प.श्री. बबलू महाराज हिवळणी, ह.भ.प.श्री.राजुदास महाराज आर्णी यांच्या अमृतवाणीतून भजनाच्या व कीर्तनाचा कार्यक्रम होईल.