दैनिक चालु वार्ता अहमदपूर ता.प्रतिनिधी- राठोड रमेश पंडित
==========================
अहमदपूर:- अहमदपूर येथील हाँटेल यश मधील सभागृहात मराठवाडा शिक्षक मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रा.किरण नारायण पाटील यांच्या निवडणूक प्रचारार्थ अहमदपूर व चाकुर तालुक्यातील शिक्षक मतदारांची एक व्यापक बैठक मराठवाडा संपर्क प्रमुख संजय भाऊ कौडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत व भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी मंत्री विनायकराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.यावेळी खासदार सुधाकर श्रृंगारे , माजी उपसभापती अशोक चिंते, जिल्हा परिषद सदस्य अशोक काका केंद्रे, त्रिंबक आबा गुट्टे, वसंत डिगोळे,माजी समाजकल्याण सभापती रोहीदास वाघमारे, तालुका अध्यक्ष शिवाजी बैनगिरे, हणमंत देवकते, रिपाइंचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब कांबळे, विठ्ठलराव बोडके, दत्ता भाऊ गलाले हे व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी मराठवाडा संपर्क प्रमुख संजय भाऊ कौडगे यांनी अहमदपूर व चाकुर तालुक्यातील शिक्षक मतदारांचा आढावा घेऊन मोठ्या मताधिक्याने भाजपचे किरण पाटील यांना विजयी करण्याचे आवाहन केले.
अहमदपूर व चाकुर तालुक्यातील ज्यास्तीत ज्यास्त शिक्षकांचे पहिल्या पसंतीचे मतदान हे भाजपचे उमेदवार प्रा.किरण पाटील यांना मिळवून देणार असल्याचे आश्वासन भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी मंत्री विनायकराव पाटील यांनी यावेळी बैठकीत दिले.
सदरील बैठकीत अहमदपूर व चाकुर तालुक्यातील शिक्षक मतदार, संस्थाचालक व भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीचे प्रास्ताविक व आभार, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष तथा अहमदपूर तालुक्याचे शिक्षक मतदारसंघ निवडणुकीचे संयोजक गोविंद गिरी यांनी केले