दैनिक चालु वार्ता मोताळा प्रतिनिधी -गणेश वाघ:- तालुक्यातील पिंप्री गवळी येथील आजोळ असलेल्या कु.रेवा दिलीप जोगदंड हिची अमेरिकेतील महत्वपूर्ण इलाईट २०२३ कमांडर ऑफ नेवल एअर फोर्स अकॅडमी करिता निवड झाल्यामुळे तिने अमेरिकन नौदलात आपले स्थान पक्के करून गरुड भरारी घेतली. पिंप्री गवळी येथील देशोन्नती पत्रकार सुधाकर विठ्ठल बोरसे यांचे मोठे बंधू कै.दिनकर विठ्ठल बोरसे यांची ती नात असून तिचे गाव कोंडा जिल्हा नांदेड आहे तर तिचे मोठे मामा रवींद्र दिनकर बोरसे बुलढाणा येथे लघु पाटबंधारे विभागात नोकरीला आहेत. मगील वीस वर्षांपासून रेवाचे कुटुंब अमेरिकेत स्थायिक झाले आहे कुमारी रेवा दिलीप जोगदंड ही अमेरिकेतील ऑस्टिन हायस्कूल हयुस्टन या शाळेत इयत्ता अकरावी शिकत असून ती नेवल जूनियर कॅडेट आहे. अमेरिकेतील पाचशे विद्यार्थ्यांमधून २६ जणांची यासाठी निवड होत असते त्यात कुमारी रेवाची निवड झाली यासाठी तिने अथक परिश्रम घेतले मागील दोन वर्षांपूर्वी अवघ्या चौदाव्या वर्षी तिने विमान चालन पात्रता चाचणी पास केली होती व विमान चालवले होते त्यामुळे भारतातही तिचे कौतुक झाले होते आता ईलाईट २०२३ कमांडर ऑफ नेवल एअर फोर्स अकॅडमी करिता निवड झाल्याने पायलट होण्याचे स्वप्न पूर्ण होणार असून या कामासाठी तिला अमेरिकन सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या तटरक्षक दलाच्या निधीतून पुढील शिक्षणासाठी 20 लाख रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे तिच्या या अभूतपूर्व कामामुळे तिचे आजोळ व तिच्या गावात गावकऱ्यांनी जल्लोष केला या यशाचे श्रेय कुमारी रेवा वडील दिलीप जोगदंड व आई वंदना जोगदंड तसेच तिच्या शिक्षकांना देते.