दैनिक चालु वार्ता कंधार प्रतिनिधी-माधव गोटमवाड
महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र आयोजित व जिल्हा उद्योग केंद्र नांदेड,ब्युटी पार्लर व रेडिमेड गारमेंट प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
याशिवाय उद्योजकता विकास,संभाषण कौशल्य,व्यक्तिमत्व विकास,बाजारपेठ तंत्र,प्रकल्प अहवाल,उद्योग व्यवस्थापन व नोंदणी,शासकीय योजना व अनुदान योजना इ.बाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर प्रशिक्षणार्थीना शासकीय प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचा उद्देश एकच की या भागातील सुशिक्षित बेरोजगार महिला सक्षम झाल्यापाहिजेत सध्याचे युग हे सुरेख अन देखणं असल पाहिजे म्हणून शहरातील व ग्रामीण भागातील महिलांना याचा लाभ मिळणार आहे ब्युटी पार्लर सह रेडिमेड गारमेंट (टेलरिंग कोर्से) करून स्वतःचा व्यवसाय करण्याची मुबा तालुक्यातील महिलांना मिळणार आहे.
ग्रामीण व शरि भागातील किमान ८ वि उत्तीर्ण महिला ज्याचे वय १८ ते ४० आहे त्यांचा या प्रशिक्षणाचा लाभ मिळणार आहे. ब्युटी पार्लर हे सर्वसाधारण माहींसाठी असून रेडिमेड गारमेंट (टेलरिंग) हा कोर्से अनुसूचित जातीतील महिलांना याचा लाभ होणार आहे. या प्रशिक्षणासाठी अर्जदाराने स्वतःचे आधार,शाळेचा दाखला,बँक पासबुक झेरॉक्स व दोन फोटो सह प्रवेश निश्चित करावा.या प्रशिक्षणामुळे महिला शिक्षित होतील व त्या चांगल्या उद्योजकता होतील.त्यांचा कौशल्य व्यक्तिमत्व विकास होईल.
तरी प्रशिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या महिला व युवतीनी प्रवेशासाठी व अधिक माहितीसाठी रूपेश कांबळे , कार्यक्रम समन्वय,एम.सी.ई.डी.(9096837698) काॅमटेक कंप्युटर सेंटर,बस स्थानकाजवळ,कुरूडे कॉम्प्लेक्स कंधार येथे दि ३० नोव्हेंबर २०२१ पर्यंत भरणे बंधनकारक आहे.असे एम.सी.ई.डी,उद्योग भवन,शिवाजी नगर नांदेड येथे संपर्क साधावा असे आवाहन एम.सी.ई.डीचे प्रकल्प अधिकारी शंकर पवार यांनी केले आहे.