दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती (दर्यापूर) :-दर्यापूर येथील मौलाना आझाद हायस्कूल जवळ मोमीनपुरा भागात दि.२१ जानेवारी रोजी सायंकाळच्या सुमारास धडक कारवाई दरम्यान मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त केला.अब्दुल राजीक अब्दुल खालीक (५५,मोमीनपुरा,दर्यापूर) व अन्य दोघांना दर्यापूर पोलीसांनी ताब्यात घेतले.
दर्यापूर शहरातील जुन्या तहसीलकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला असलेल्या मोमीनपुरा भागात येथील रहिवासी अब्दुल राजीक याच्या घरात मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा व शस्त्र बनवण्याचे साहित्य असल्याची गुप्तमाहिती दर्यापूर पोलीसांना मिळाली होती.गुप्तमाहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक संतोष ताले बंदोबस्तात संशयीत्याच्या घरी शनिवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास अब्दुल राजीक यांच्या घरी धाड टाकली असता पोलीस कारवाई दरम्यान कुटुंबातील सदस्यांनी आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला मात्र पोलीसांनी त्याला न जुमानता अब्दुल राजीक याच्यासह तिघांना ताब्यात घेत ८ तलवारी,२ फरसे,भाला आणि विविध प्रकारचे चाकू व गुप्त्यासह मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त केला.दर्यापूर उपविभागीय पोलीस अधिकारी सचिंद्र शिंदे,पोलीस निरीक्षक संतोष ताले,पोलीस उपनिरीक्षक विनायक लंबे,येवदा पोलीस स्टेशनचे ठाणेदार आशिष चेचरे,रहिमापूरचे ठाणेदार निलेश देशमुख,खल्लारचे ठाणेदार चंद्रकला मेसरे,पीएसआय सिद्धोधन नितनवरे,यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी या धडक मोहिमेत सहभाग घेतला.