
दै चालु वार्ता वृत्तसेवा
कोल्हापूर :कोल्हापूर विधानपरिषद भाजप उमेदवार अमोल महाडिक यांचा उमेदवारी अर्ज आज भरण्यात आला. या पार्श्वभूमीवर झालेल्या पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटील बोलत होते.
महाविकास आघाडी सरकार आता काहीच दिवसांचे राहिले आहे. येणाऱ्या नव्या वर्षात राज्यात सत्ताबदल होईल, असा गौप्यस्फोट भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत केला.
यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘विधानपरिषदेच्या निवडणुकीत अमल महाडिक मोठ्या फरकाने निवडून येतील. कारण जिल्ह्यातील नगरपालिकांमध्ये भाजप लोकप्रतिनिधींची संख्या अधिक आहे. याशिवाय जे अपक्ष लोकप्रतिनिधी असलेलेही भाजप बरोबर येतील. कारण ज्यांना राजकीय भविष्य जाणता येते त्यांना महाविकास आघाडी सरकार फार काळ टिकणार नाही याची कल्पना आहे. येणाऱ्या नवीन वर्षात काही दिवसातच महाविकास आघाडी सरकार राज्यातून जाईल. त्यानंतर देशात आणि राज्यात भारतीय जनता पक्ष सत्तेत असेल. ही बाब लक्षात घेऊनच अपक्ष उमेदवार आमच्यासोबत आहेत. त्यामुळे विजयाची मॅजिक फिगर आम्ही पार करूच पण अमोल महाडिक मोठ्या फरकाने निवडून येतील, असेही प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले.