दैनिक चालु वार्ता मुखेड तालुका प्रतिनिधी -सुरेश जमदाडे
नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्याजिल्हा संघटकपदी पत्रकार संघाचे माजी तालुकाध्यक्ष तथा दैनिक पुण्यनगरी चे मुखेड तालुका प्रतिनिधी कामशेट्टे यांची निवड करण्यात आली असून मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे यांनी संदीप कामशेट्टे यांच्या जिल्हासंघटक पदच्या नियुक्तीची घोषणा नुकतीच केली आहे.
परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांनी कामशेट्टे यांचे अभिनंदन करून पुढील कार्यास शूभेच्छा दिल्या आहेत. संदीप कामशेट्टे यांची जिल्हा संघटकपदी झालेल्या नियुक्तीबद्दल सर्व पत्रकार व तसेच मुखेड तालुका पत्रकार संघटनेच्यावतीने विविध क्षेत्रं तील व्यक्तीने अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत. संदीप कामशेट्टे हे गेल्या अडीच दशकापासून संघाच्या पत्रकारितेत योगदान देत आहेत. सामजिक सांस्कृतिक शैक्षणिक क्षेत्रात कामात नेहमीच ते अग्रेसर असतात कोरो ना प्रादुर्भाव काळात पत्रकार साठी संरक्षक कोरोना विमा कवच त्यांनी उतरविले होते तर आरोग्य तपासणी शिबिर, सर्व सामान्य नागरिकांना उबदार ब्लँकेट चे वाटप पत्रकार संघाचे वतीने त्यांनी केलं आहे हे विशेष त्यांच्या कार्याची दखल घेवून परिषदेने त्यांची निवड केली आहे. या निवडीबद्दल परिषदेचे विश्वस्त एस. एम. देशमुख, किरण नाईक, अध्यक्ष शरद पाबळे, माजी अध्यक्ष संजीव कुळकर्णी, कार्याध्यक्ष मिलिंद अष्टवीकर, सरचिटणीस मन्सूर खान, कोषाध्यक्ष विजय जोशी, विभागीय सचिव सचिन शिवशेट्टे, माजी पदाधिकारी चारूदत्त चौधरी, प्रकाश कांबळे, जिल्हाध्यक्ष गोवर्धन बियाणी, कालिदास जहागीरदार, प्रदिप नागपूरकर, आदिंचे कामशेट्टे यांनी अभार मानले आहेत. मुखेड तालुका पत्रकार संघटनेकडून संदीप कामशेट्टे अभिनंदन करण्यात आले आहे.
गणाचार्य मठ संस्थान प्रमुख डॉ विरुपक्षा शिवाचार्य महाराज, नाराशम मठ संस्थांनचे नराशम महाराज, शिवलिंग बादशहा मठ संस्थानचे प्रमुख सिध्ददयाळ महाराज बेटमोगरेकर सह आ. डॉ तुषार राठोड, आ. राम पाटिल रातोळीकर, माजी आ. अविनाश घाटे, माजी आ. सुभाष साबणे,माजी आ. हणमंत पाटील बेटमोगरेकर भाजपा जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर ,माजी नगराध्यक्ष गंगाधर राठोड, डॉ. दिलीप पुंडे, बळवंत पाटील बेटमोगरेकर माजी जि.प. सभापती स्वप्नील चव्हाण, राजन देशपांडे, डॉ. व्यंकट सुभेदार भोसले, शिवाजी जाधव, काँग्रेस तालुकाध्यक्ष राजू पाटील रावनगावकर, भाऊसाहेब पाटील मंडलापुरकर, संतोष बोनलेवाड, दशरथराव लोहबंदे, व्यंकटराव लोहबंदे, बालाजी पाटील कबनुरकर, नागनाथ लोखंडे, भालचंद्र नाईक यासह अनेकांनी त्यांचे अभिनंदन करून शुभेछा दिल्या आहेत.