दैनिक चालु वार्ता प्रतिनीधी नांदेड – प्रा.यानभुरे जयवंत सोपानराव
.नांदेड – महाराष्ट्राची मुलुख मैदानी तोफ म्हणून ओळखले जाणारे मन्याड खोऱ्याचे बहाद्दर मर्द तथा मन्याड खोऱ्याचा वाघ , शेतकरी कामगार पक्षाचे दिवंगत ज्येष्ठ नेते तथा श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी कंधारचे संस्थापक , संचालक , दर्पण पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ संपादक , गुराखी पिठाचे संचालक , ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी माजी खासदार व आमदार दिवंगत डॉ.भाई केशवरावजी धोंडगे साहेब यांच्या तैलचित्राचे रेखाटन सोनखेड येथील श्री शिवाजी उच्च माध्यमिक विद्यालयात इयत्ता बारावी विज्ञान शाखेत शिकत असलेल्या भगवान गोविंदराव सर्जे या विद्यार्थ्यांनी अतिशय बारकाईने उच्चतम दर्जाचे व अप्रतिम स्वरूपाचे रेखाटले आहे. . भगवानराव सर्जे या विद्यार्थ्यांनी मातोश्री मुक्ताई च्या कुशीत विसावा घेतलेल्या मुक्ताईसुत डॉ.भाई केशवरावजी धोंडगे साहेब यांच्या तैलचित्राचे रेखाटन अप्रतिम स्वरूपाचे केल्यामुळे सोनखेड व सोनखेड परिसरात भगवानराव सर्जे यांच्या कलेची व त्यांच्या अंगी असलेल्या कौशल्य गुणांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. .सर्जे यांच्या अंगी असलेली चित्रकलेची आवड व कौशल्य गुणप्राप्ती व अचूक रेखाटन या गुणवैशिष्ट्यामुळे भगवानराव सर्जे या इयत्ता बारावी विज्ञान शाखेत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांचे श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सोनखेड चे मुख्याध्यापक तथा प्राचार्य भगवानराव पवळे सर यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.