दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती (अंजनगाव सुर्जी) :-जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी शहरात नेताजी सुभाषचंद्र बोस आणि हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे या दोन्ही महामानवांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सुर्जी परिसरातील नेहरू चौक येथे यावेळी जयंती उत्सव मोठ्या थाटात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या सुरवातीला नेताजी सुभाषचंद्र बोस आणि हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन तसेच हारार्पण करण्यात आले.त्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांनी आपल्या भाषणातून दोन्ही महामानवांचे विचार उपस्थित नागरिकांच्या समोर मांडून त्यांच्या विचारांना उजाळा दिला.
यावेळी उपस्थित उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख राजू अकोटकर,गजानन चौधरी,गजानन लवटे,महेंद्र दिपटे,विकास येवले,महिला तालुका प्रमुख तुरखडे ताई,तुरखडे सर,मनोहर तारेकर,विनोद पायघन,गजानन पाठे,अंकुश गुजर,माजी नगरसेवक बळीराम धर्मे,सुभाष अस्वार,दिनेश लोळे,गंगाराम चंदनपत्री,रवि नाथे,शाम येउल,प्रवीण नेमाडे,शरद फिस्के,प्रदीप अडगोकर,गजानन विजेकर,मयुर रॉय,सुरज पवार,किशोर हाडोळे,नंदू गायगोले,दीपक पिंगे,शुभम कहार,संदीप पिंगे,अनुप रेखाते,रामेश्वर आवंडकर,प्रशांत पाटील,आदील खतीब,अफरोज सौदागर,फिरोज भाई,पुरुषोत्तम आवंडकर,राहुल ताडे,रोहित केदार,अंकुश धुळे,शुभम बुढळकर,शुभम भोंडे,गौरव तायडे,गौरव कतोरे,सोनू विजेकर,सुमित सतारे,सोनू तायडे,अनिसभाई,नितीन निंबोकर,सचिन लुटे,चेतन खंडारे,गजानन कराळे,नसीम बेग,सुरज अरबाळ,संदीप घन,विनोद सोनोने,रमेश तायडे,भावेश कोळखरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.