दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी परतुर/…
मा.एकनाथ संभाजीराव शिंदे (मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य) यांना.मा.जिल्हाधिकारी साहेब जालना यांच्या मार्फत,दिनांक,२३ जानेवारी २०२३ रोजी चर्चा करून निवेदन दिले,पुणे जिल्ह्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हाध्यक्ष समीर थिगळे गोळीबार करून जीव घेणे हल्ला करणाऱ्या गुंडानवर मोका अंतर्गत गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात यावी निवेदनात पुढे म्हटले आहे,वरील विषयावर आम्ही आपले लक्ष वेधू इच्छितो कि महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुणे जिल्हाध्यक्ष समीर थिळगे यांच्यावर राजगुरुनगरच्या सातकरस्थळ येथील राहत्या सुदैवाने जीवित हानी झाली नाही, मागील अनेक वर्षापासून समीर तिगळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे श्रीमान राज साहेब ठाकरे यांचे कट्टर समर्थक एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून काम करत आहेत, परंतु कुख्यात गुंडांनी हा गोळीबार केला आहे, समीर यांच्या कुटुंबीयांसमोर गोळीबार केल्याने परिसरात आणि कुटुंबात कितीचे वातावरण निर्माण झाले आहे याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अद्याप आरोपी अटक झालेली नाहीत, समीर थिळगे गुंडांनी फोन करून पैशाची मागणी केली तसेच मी खेडचा भाई आहे तुला खूप माज आला का असी धमकी देऊन तुला व तुझ्या कुटुंबाला संपून टाकतो असे म्हणत पिस्तूल रोखून समीर थिळगे यांच्याकडे पैशाची मागणी केली होती, त्यानंतर या गुंडांनी गोळीबार केला, यामागे राजकीय षडयंत्र आहे का याचा तपास करून संबंधित सर्व लोकांवर मोका कायद्यांतर्गत तत्काळ गुन्हे दाखल करा ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना जालना जिल्ह्याच्या वतीने मागणी करून अपेक्षा करत आहोत,महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हा अध्यक्ष पुणे समीर थिळगे यांच्यावर गोळीबार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये भीती निर्माण षडयंत्र रचून दहशत निर्माण करणाऱ्या गुंडांना व त्यांच्या मास्टरमाईंड लोकांना तत्काळ मुका कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना त्वरित अटक करण्यात यावी, योग्य वेळेत गुंडांना अटक न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी असा इशारा
प्रकाश सोळंके जिल्हाध्यक्ष, यांनी दिला कृष्णा गोवर्धन सोळंके मनसे तालुका अध्यक्ष परतुर, तुकाराम मनविसे तालुका अध्यक्ष परतुर, कदम, महादेव चव्हाण सोबत महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते….