दैनिक चालु वार्ता तालुका प्रतिनिधी-विष्णु मोहन पोले.
अहंमदपूर: तालुक्यातील रुई येथील प्रसिद्ध किराणा दुकानदार सचिन पाटील यांचा वाढदिवस दि: 22जानेवारी रोजी होता.आजकाल वाढदिवस म्हंटल्या नंतर पार्ट्या,गाणे, नाच,डीजे,मिरवणूक अशी क्रेझ आहे पण सचिन पाटील याला अपवाद आहेत.त्यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त माझा वाढदिवस ! माझे पुस्तक!या उपक्रमाचा अवलंब करत आपल्या गावातील जिल्हा परिषद शाळेला 18 पुस्तकाची भेट देऊन गावातील विद्यार्थी आणी शिक्षकाबरोबर आपला वाढदिवस साजरा केला.त्यांनी हा घेतलेला निर्णय कौतुकास्पद आहे आणी आजच्या युवा पिढीसाठी हा आदर्श आहे.आपण वाढदिवसानिमित्त इतर खर्च करण्यापेक्षा पुस्तकें देणे,झाडें लावणे,गरजू लोकांना उपयोगी पडतील अशी उपक्रम राबवणे हे हितकर होईल असे ते म्हणाले.ह्या त्यांच्या अनोख्या वाढदिवस साजरा करण्यामुळे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.त्यांच्या वाढदिवसानिमित्त उपस्तिथ ,शाळेचे मुख्यधापक श्री सूर्यकांत बोईनवाड सर,सहशिक्षक सतीश हलगरे,कोत्तापले सर,शेख सर,शिवणे सर,गावातील प्रतिष्ठित नागरिक गणेश पांचाळ, रा.वि. काँग्रेस ता.उपाध्यक्ष अतुल पाटील,इतर गावकरी व सर्व विध्यार्थी यांची उपस्तीथी होती.