दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा. दवणे..
मंठा.मराठी माणूस बेरोजगार व गरीब आहे हे त्यांनी महाराष्ट्राच्या लक्षात आणून त्या दिशेने मराठी माणसाला रोजगार आणि स्वाभिमानाची ऊर्जा निर्माण करून असंख्य गरजवंतांना त्यांनी मदत करून उच्च पदावर खासदार, आमदार, जिल्हाप्रमुख नगरसेवक या पदावर नेऊन पोहोचवले मराठी माणसाने प्रेरक म्हणून हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या एका आवाजात मुंबई बंद पाडणारा हा महाराष्ट्राचा वाघ दिल्लीच्या गादीलाही घाम फोडणारा असा छावा.
महाराष्ट्राला खरी शिकवण देऊन लाल दिव्याची गाडी कधी न वापरून सुद्धा देशाच्या कानाकोपऱ्यात एकच नाव ते म्हणजे हिंदुरुदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्ताने ता २३ रोजी प्रल्हादराव बोराडे कॉम्प्लेक्स येथे अभिवादन करण्यात आले. गोरगरीब रुग्णांना फळ वाटप गरीबाच्या कुटीमध्ये जाऊन अत्यावश्यक साहित्यांचेही वाटप सामाजिक उत्तरदायित्वाने माणुसकीचे नाते जपत गरज ही शोधाची जननी मनी ठेवून मोठ्या प्रमाणामध्ये सामान्य गोरगरीब कुटुंब कष्टकरी कामगार मोलमजुरी करणाऱ्यांना शिवसेनाप्रमुख हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्ताने सहकार्याची माणुसकी जपण्याचा प्रयत्न केला.यावेळी मंठा तालुका प्रमुख उदयसिंह बोराडे,उप तालुकाप्रमुख गजानन कापसे, ओबीसी सेल अध्यक्ष चांदभाई पठाण,दलीत आघाडी अध्यक्ष दिलीपराव हिवाळे, युवासेना उपतालुकाप्रमुख लिंबाजी बोराडे, युवासेना शहरप्रमुख ॲड.राजेश खरात साहेब,रामराव वरकड,माऊली वायाळ,गजानन मालकर,अर्जुन राठोड,अलीम कुरेशी,नितीन राठोड,वैजनाथ ढवळे,सुनील पुणेकर,अक्षय वायाळ,राहुल बोने,विकास गोंडगे,शिवम उगले,अर्जुन राठोड,पवन वरकड,राधे दहातोंडे,वेदांत खरात,शिधू जाधव,विशाल राठोड,सुमित चव्हाण, पांडुरंग बादाडे व अनेक शिवसैनिक उपस्थित होते