दैनिक चालु पुणे जिल्हा प्रतिनिधी -विशाल खुणे
दि 23 जानेवारी पुणे ( खराडी )
शोतोकान कराटे दो स्पोर्ट्स असोसियेशन (एस.के.एस.ए.)च्या वतीने गोल्डन बेल्ट ओपन नॅशनल कराटे चॅम्पियनशिप 2023 भरवून या वर्षीचे दैदिप्यमान यश संपादित केले तसेच गेल्या बऱ्याच वर्षांपासून विश्रांतवाडी, महालक्ष्मी लॉन्स खांदवे नगर, भागात जीवाची पर्वा न करता बाजी लावून कराटे खेळा विषयी अभूतपूर्व उल्लेखनीय कार्य करणे चालु आहे याची कराटे खेळातील त्यांची बऱ्याच वर्षांची खातरजमा, मागोवा घेवून कार्यक्रमास आलेल्या सर्व विद्यार्थी खेळाडू, पालक, प्रेषक यांच्या शाब्दीक विचारांचा तीन दिवस पूर्ण कार्यक्रमात लक्ष देवून अभ्यास करून दि गुड पिपल्स फाऊंडेशन च्या पुणे शहर महिला अध्यक्षा डॉ नीता गोडबोले यांनी शोतोकान कराटे दो स्पोर्ट्स असोसियेशन चे फाउंडर अँड प्रेसिडेंट अमितकुमार ठाकूर यांचा संस्थेच्या वतीने प्रशस्तिपत्रक देवून सन्मान केला आणी त्यांच्याबद्दल उपस्थित हजारो लोकांच्या समोर ठाकूर यांच्या अतुलनीय कार्याबद्दल बोलताना डॉ नीता गोडबोले म्हणाल्या की “कराटेप्रशिक्षक अमितकुमार ठाकूर यांचे कार्य निरखून पाहिले तर हे कराटे या क्रीडाक्षेत्रातील महाराष्ट्रातील बादशाह आहेत असे म्हणायला वावगे नाही तेच कराटे या खेळाला योग्य तो न्याय देवू शकतील” असे त्या म्हणाल्या .
या कार्यक्रमात पुणे पिंपरी- चिंचवड तसेच महाराष्ट्रातील बऱ्याच शाळा आणी जवळ जवळ 1000 विद्यार्थी यांनी सहभाग नोंदविला यशस्वी विद्यार्थी यांना गोल्डन बेल्ट, गोल्डन, सिल्वर, ब्राँझ मेडल, सर्टिफिकेट, सायकल, बॅटरी वरिल टू व्हीलर असे एक से बढकर एक बक्षीस देण्यात आले , विद्यार्थी पालक प्रेक्षक यांनी त्याचा आनंद लुटला. स्पर्धे बद्दल तुम्हाला कसे वाटले असे विचारले असता ठाकूर म्हणाले की स्पर्धकांचा वाढता प्रतिसाद आणी प्रत्येक शाळेने माझ्या बद्दल आणी माझ्या कराटे असोसियेशन बद्दल दाखविलेले प्रेम पालकांच्या चेहऱ्यावरिल आनंद पाहून मी मंत्रमुग्ध जाहलो आहे मी आणी माझी पूर्ण टीम ने कराटे हा खेळ आणी त्यातील स्पर्धक यांना योग्य तो न्याय आणी मान मिळवून देण्याचा वसा घेतला आहे असे ते बोलताना म्हणाले पुढे ते म्हणाले की हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जीवाची बाजी लावणारे माझे मित्र सहकारी विष्णू दहिन्जे सर, सागर लोखंडे सर, अक्षय सरोदे सर यांचा ही सिंहाचा वाटा आहे असे म्हणुन टीम चे आभार व्यक्त केले .
कार्यक्रमास उपस्थिती विशाल गोरे, विष्णू दहिंजे (कॉन्फीटिशन 2023 प्रमुख इनचार्ज), सागर लोखंडे (सेक्रेटरी), अक्षय सरोदे (खजिनदार), संजय जैन (नमो फौंडेशन अध्यक्ष), जब्बार मुलाणी (दि जि पी फौंडेशन पुणे शहर अध्यक्ष), नीता गोडबोले, तेजस झ् गडे, अभीजीत जगताप, वर्षा खुणे, रुक्साना मुलाणी आदी मान्यवर उपस्थित होते.