
दैनिक चालु वार्ता म्हसळा – रायगड प्रतिनिधी -अंगद कांबळे
म्हसळा येथे संपन्न विज्ञान प्रदर्शन विजेत्या स्पर्धकांचे बक्षिस वितरण कन्या शाळेत करण्यात आले.खरसई आदर्श शाळेने प्रदर्शनात सादर केलेल्या बहुउद्देशीय भात लावणी यंत्र या प्रकल्पाला म्हसळा तालुक्या मधुन प्रथम क्रमांक मिळाला. या प्रकल्पाचे जिल्हा स्तरावर निवड झाल्याने सर्वच स्तरातून खरसई शाळेचे कौतुक होत आहे.शाळा विध्यार्थी प्रतिक खोत, लावण्या शितकर,सिध्दी पयेर,शिक्षक जयसिंग बेटकर यांनी विज्ञान प्रदर्शनात यश मिळवण्यात यश प्राप्त केले.शाळा कमेटी अध्यक्ष निलेश मांदाडकर यांनी यशस्वी विद्यार्थी आणि शिक्षक यांचे कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. बक्षिस वितरण कार्यक्रमाला प्र.पोलिस निरीक्षक संदीपान सोनवणे,गटशिक्षणाधिकारी दौंड,वनपरिक्षेत्र अधिकारी संजय पांढरकामे,विस्तार अधिकारी आडे,केंद्र प्रमुख अरविंद मोरे,किरण पाटील,किशोर मोहिते,नरेश सावंत, गटसमन्वयक कौचाली, दिपक पाटील,अनिल बेडके,नंदकुमार जाधव, पैलकर आदी मान्यवर उपस्थित होते. सादरीकरण केलेल्या विज्ञान प्रकल्पाला प्रफुल्ल रंगांरे,महाराष्ट्र राज्य ग्राम प्रवर्तक,रत्नशेखर गजभेय,जिल्हा समन्वयक,स.गटविकास अधिकारी मंगेश साळी,कृषी विस्तार अधिकारी एस.डी.शिंदे,एस.एन.कुसळकर कृषी पर्यवेक्षक,कृषी सेवक सरनाईक,देवडे,आदर्श शेतकरी प्रभाकर बोले,शिक्षण प्रेमी सिध्दांत शिंदे,वरवठणे केंद्र प्रमुख किरण पाटील आदी मान्यवर यांनी भेटी दिल्या.आधुनिक पध्दतीचा बहुउद्देशीय भात लावणी यंत्र मॉडेल या प्रकल्पाला शुभेच्छा देताना कमी मनुष्यबळ वापरून शेती करू शकतो अशी प्रतिक्रिया दिली.मान्यवरांना प्रतिक खोत इयता ७ वी याने सविस्तर माहिती दिली.