दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती (अंजनगाव सुर्जी) :-समाजातील महत्त्वाचा घटक म्हणून समजला जाणाऱ्या आदिवासी समुदायातील मुलांसोबत अंजनगाव सुर्जी शहरात नेताजी सुभाष चंद्र बोस तसेच हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून बाळासाहेबांची शिवसेनेच्या वतीने श्रीनाथ वनवासी छात्रालय येथील आदिवासी शाळकरी मुलांसोबत जयंती उत्सव साजरा करण्यात आला.यावेळी दोन्ही महामानवांच्या जयंती निमित्त दिनांक २३ जानेवारी सोमवार रोजी श्रीनाथ वनवासी छात्रालय येथे सर्वप्रथम नेताजी सुभाषचंद्र बोस आणि हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन व हरार्पण करून अभिवादन करण्यात आले.
जयंती तर कोणीही साजरी करत परंतु महामानवांच्या विचारांना अनुसरून श्रीनाथ वनवासी छात्रालय येथील आदिवासी शाळकरी मुलांना त्यांच्या शिक्षणासंबंधित तसेच त्यांच्या दैनंदिन आहारा संबंधित आम्ही सर्व कार्यकर्ते योग्य काळजी घेऊ तसेच समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचा बाळासाहेबांची शिवसेना आम्ही कार्यकर्ते अगदी वेगळ्या प्रकारे जयंती उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला असे बाळासाहेबांची शिवसेना अंजनगाव सुर्जी शहर प्रमुख मुन्ना इसोकार यांनी यावेळी म्हटले.
यावेळी उपजिल्हा प्रमुख जांभूळकर,तालुका प्रमुख बारब्दे,गोपाल नागे,महीला शहर प्रमुख पुजा वासनकर,अक्षय बोरकर,अक्षय लांडे,प्रकाश अस्वार,आकाश ठोकळ,योगेश दोबाले,आदी पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.