दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी:संतोष मनधरणे
देगलूर प्रतिनिधी: दि. २४ जानेवारी…..
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने २७ वी राज्यस्तरीय कामगार पुरुष आणी १७ वी महिला भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे दरवर्षी राज्यस्तरीय भजन स्पर्धेचे आयोजन केले जाते. या वर्षीच्या राज्यस्तरीय स्पर्धा आयोजनाचा बहुमान मराठवाडा विभागाला मिळाले आहे.
या स्पर्धा औरंगाबाद येथील तापडिया नाट्यमंदिर येथे २९ व ३० जानेवारी-२३ रोजी होणार असून राज्यभरातून ३८ भजनी संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहे.
या स्पर्धेचे उद्घाटन रविवारी स. १० वाजता मानव संसाधन विभागाचे उपाध्यक्ष बालाजी मुळे, कामगार उपायुक्त चंद्रकांत राऊत, दै. सकाळचे निवासी संपादक दयानंद माने यांच्या उपस्थितीत होणार आहे. तर सोमवारी सायं. ७ वाजता या स्पर्धेचे पारितोषिक वितरण मराठवाडा विकास मंडळाचे अपर आयुक्त विजयकुमार फड, दै. लोकमतचे संपादक चक्रधर दळवी यांच्या शुभहस्ते होणार असून यावेळी कामगार कल्याण मंडळाचे कल्याण आयुक्त रविराज इळवे यांची उपस्थिती राहणार आहे.
या भजन स्पर्धेत नाशिक, नागपूर, जळगाव, चंद्रपूर, अकोला, अमरावती, ठाणे, नायगाव, अंधेरी, चिपळूण, पुणे, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, औरंगाबाद, नांदेड, लातूर या गटातील ३८ महिला व पुरुष भजनी संघाचे सादरीकरण होणार आहे. कोरोना संसर्गाच्या दोन वर्षाच्या कालखंडानंतर या भजन स्पर्धा होत आहे.
या स्पर्धेचा लाभ घ्यावा असे आवाहन कल्याण आयुक्त रविराज इळवे, प्र. सहाय्यक कल्याण आयुक्त मनोज पाटील यांनी केले आहे.