
दै.चालू वार्ता प्रतिनिधी पेठवडज बाजीराव गायकवाड
‘हर घर दस्तक अभियान’ अंतर्गत नांदेड जिल्ह्यात बुधवार दि. २४ नोव्हेंबर २०२१ रोजी कोवीड- १९ अर्थात कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाअंतर्गत नांदेड जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयात कार्यरत असलेल्या मूळ नांदेड जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी बुधवारी दि. २४ नोव्हेंबर रोजी आपल्या मूळ गावात जाऊन गावातील लसीकरण न झालेल्या प्रत्येक नागरीकाची भेट घ्यावी. सकाळी ९ ते १० वाजेपर्यंत त्यांना लसीकरणाचे फायदे समजावून सांगावेत, लसीकरणासाठी प्रोत्साहीत करावे. त्यानंतर सायंकाळी ५ वाजेपर्यंत वैयक्तिक लक्ष देऊन त्यांचे लसीकरण करून घ्यावे. अधिक माहितीसाठी सोबतचे परीपत्रक पाहावे.असे आवाहन नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटणकर यांनी केले आहे.