
दै.चालू वार्ता
प्रतिनिधी पेठवडज बाजीराव गायकवाड.
पेठवडज :-गावातील सर्व मिटरधारकांना चार पट बिल आले असून महावितरण विदयुत पारेषण महामंडळाचा भोंगळा कारभार पेठवडज येथील जनतेला एक नाही दोन नाही तीन नाही चार पटीने जास्त बिल आले असून बिल कमी करून देण्यास पेडवडज येथील अभियंता नकार देत आहेत ते म्हणत आहेत. आमच्या हातात काही नाही ते वरून आले आहे. वरून म्हणजे काय स्वर्गातून आले की काय अशी जनता म्हणत आहे यांच्या हातात विजबिल कमी करण्याचे अधिकार नाहीत तर बिल वसूल करण्याचे अधिकार यांना कोणी दिले विदयुत पारेषण महामंडळाचे डोके ठिकाणावर आहे काय छापील बिल दिलेच नाही एस एम एस वर चार पट बिल पाठविले आहे. अगोदरच अतिवृष्टी ढगफूटी मुळे नागरीक संकटाचा सामना करत असून विदयुत मंडळाने नविनच संकट उभे केले आहे.जर बिल कमी करून दिले नाही तर पेठवडज येथील सर्व मीटर धारक उपोषण करणार असून विदयुत मंडळाच्या वरीष्ठ अधिका-यांनी वेळीच लक्ष्य देऊन विज बिल कमी करून द्यावे असे पेठवडज येथील विदयुत मिटरधारक करीत आहेत.