दैनिक चालु वार्ता रायगड / म्हसळा – प्रतिनिधी – अंगद कांबळे
म्हसळा – कोकण उन्नती मित्र मंडळ मुंबईचे वसंतराव नाईक कला, वाणिज्य महाविद्यालय आणि बॅरिस्टर ए. आर. अंतुले विज्ञान महाविद्यालय म्हसळा-रायगड विश्वस्त सचिव प्रतिनिधी मा. श्री. फजल हळदे साहेब आणि प्रभारी प्राचार्य मा. श्री. प्रा. दिगंबर टेकळे यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक, राष्ट्रीय सेवा योजना, डब्ल्यू. डी. सी. आणि डी. एल. एल. ई. विभाग अंतर्गत राष्ट्रीय मतदार दिनानिमित्ताने मतदार जनजागृतीपर पथनाट्य, पोस्टर मेकिंग, निबंध लेखन, वक्तृत्व स्पर्धा, कविता वाचन, मतदार नोंदणी मार्गदर्शन अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन आले. म्हसळा तहसिलदार मा. श्री. समीर घारे साहेब यांच्या मुख्य उपस्थितीत अंजुमन इस्लाम जंजीरा शाळा – म्हसळा एस टी स्टंड – म्हसळा बाजार पेठ – म्हसळा कन्या शाळा ते नाईक-अंतुले महाविद्यालय म्हसळा दरम्यान मतदार जनजागृतीपर रॅली काढण्यात आली. शेवटी राष्ट्रीय मतदार दिनाची शपथ घेवून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. कानिफ भोसले, प्रा. डाॅ. संजय बेंद्रे, प्रा. तुषार उमासरे, प्रा. सलमा नझिरी, श्री. शंतनु शिरपूरकर, श्री. स्वरूप नाईक, कु. अवंतिका बोरकर, कु. दिव्या पाटील आणि सर्वच एन.एस.एस स्वयंसेवकांनी सहकार्य केले. अशी माहिती एन.एस.एस कार्यक्रम अधिकारी प्रा. सुमित चव्हाण यांनी दिली.