दैनिक चालु वार्ता रायगड / म्हसळा – प्रतिनिधी -अंगद कांबळे
म्हसळा – भारतीय प्रजासत्ताक दिन म्हसळा तालुक्यात व शहरातील विविध कार्यालयात, शाळा, महाविद्यालयात उत्सहात साजरा करण्यात आला म्हसळा तहसील कार्यालयात मा. तहसील दार समीर घारे साहेब यांच्या हस्ते ध्वजारोहण पारपडला या वेळी या वेळी नायब तहसीलदार मा गणेश तेलंगे, महसूल तहसीलदार मा. डी. जे. पाटील, श्रीमती निमकर, श्रीमती सगरे, श्री. शहा तात्या, श्री माने, श्री गिरे,
कर्मचारी नाकती, उपस्थित होते
जिजामाता मराठी माध्यमिक शाळा आगरवाडा
या शाळेत शाळेचे संस्थापक श्री महादेवराव पाटील साहेब यांच्या शुभहस्ते “ध्वजारोहण “पारपडला या वेळी वरवठणे ग्रुप ग्रामपंचायतचे माजी सरपंच श्री रियाजभाई फकीह, मुख्याद्यापक श्री संदीप काबळेकर, शिक्षक दीपक म्हात्रे, अंकुश गाणेकर,लक्ष्मण गाणेकर विद्यार्थी उपस्थित होते
राजीप शाळा म्हसळा आदर्श शिक्षिका प्रा.शुभदा दातार यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न.
रायगड जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा म्हसळा नं.१ मध्ये
भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७३ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साही आणि आनंदाने साजरा करण्यात आला.शाळेचा ध्वजारोहन कार्यक्रम शाळेच्या आदर्श शिक्षिका प्राचार्य शुभदा संतोष दातार यांच्या शुभ हस्ते”ध्वजारोहन” करून मानवंदना देण्यात आली. शाळा समिती अध्यक्ष शशिकांत ऊर्फ बाबु शिर्के यांनी या वर्षीचा ध्वजारोहन करण्याचा बहुमान दातारबाई यांना दिला.ध्वजारोहन कार्यक्रमाला ज्येष्ठ साहित्यिक माजी शिक्षक विलास यादव,उपनगराध्यक्ष सुनिल शेडगे,गटनेते संजय कर्णिक,समाजसेवक समीर बनकर,माजी सभापती छाया म्हात्रे,भाई बोरकर,बाळ ढवळे,अनिल पोतदार,प्रसाद बोर्ले,पालक समितीचे महेश पवार,प्रवीण बनकर,सतिश शिगवण,दिपल शिर्के,किशोर बोरकर,अनंत अंबावले,कल्पेश जैन,विनोद जैन, मीनल ढवळे, श्रीमती वेदक,जवळे,वेदक,साळुंखे,बनकर आदी मान्यवर मंडळी शिक्षक पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.शाळेतील इयत्ता पहिली ते चौथी मधील विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभुषा परिधान करून भारतीय प्रासत्ताकदिनाच्या देशभक्तीपर घोषणा देत कार्यक्रमाचा उत्साह द्विगुणित केला होता.शाळा शिक्षिका सुमित्रा गावडे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले तर भारत देशाचे अमृत महोत्सवी वर्षात ध्वजारोहणाचा मान मिळाल्याने त्यांनी सर्वांचे शिक्षक पालक समितीचे मनोमन धन्यवाद मानले.
प्रजासत्ताक दिनी पी.एन.पी.पाष्टी हायस्कूलचे ध्वजारोहण जेष्ठ शिक्षक श्री.प्रफुल्ल रामचंद्र पाटील सर यांच्या हस्ते संपन्न झाला. या वेळी शिक्षक विनयकुमार सोनावणे, श्री ललित पाटील, श्री बिलाल शिकलगार विद्यार्थी, पालक अंगणवाडी ताई अशासेविका इत्यादी उपस्थित होते
न्यू इंग्लिश स्कुल व ज्यु कॉलेज म्हसळा येथे प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला ध्वजारोहण प्राचार्य प्रकाश हाके यांच्या ” शुभहस्ते ” करण्यात आला या वेळी स्थानिकस्कुल कमेटी चेअरमन श्री समीर बनकर, प्रा महंमद शेख, श्रीमती कल्पना देवगावकर, श्रीमती पर्यवेक्षक श्री नेताजी गायकवाड, संजय वसावे श्री ए.सी पाटील, श्री कामंडी, श्री खोकले, प्रा चक्रधर चव्हाण, प्रा. कुताडे प्रा. जमदाडे कला शिक्षक सुनील बंडगर, क्रीडाशिक्षक हणमंत मोरे श्रीमती शिर्के, श्री उद्धव खोकले, श्री मुंडे, श्री सुतार, श्री गर्जे, श्री भायदे कर्मचारी, देवा काका, श्री जंगम, श्री काते विदयार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते