
दै.चालू वार्ता
प्रतिनिधी : केंद्रे प्रकाश
नवी दिल्ली :– केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान; राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) पृथ्वी विज्ञान; पंतप्रधान कार्यालय , कार्मिक, सार्वजनिक तक्रारी, पेन्शन, अणुऊर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंग यांनी आज इस्रोच्या 5 दिवसीय तंत्रज्ञान परिषद -2021 चे उद्घाटन केले आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था, इसरो द्वारे विकसित केल्या जाणाऱ्या भविष्यवादी आणि विघटनकारी तंत्रज्ञानाची माहिती दिली. इसरोच्या नेतृत्वाखाली तंत्रज्ञान विकास आणि अभिनवता संचालनालय (DTDI) द्वारे या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
काही भविष्यवादी तंत्रज्ञानासंदर्भात न डॉ जितेंद्र सिंह म्हणाले, उपग्रह आधारित क्वांटम कम्युनिकेशनचा विकास देशाच्या संप्रेषण नेटवर्कला बिनशर्त डेटा सुरक्षा बाबतीत सक्षम करेल.
ते म्हणाले की प्रत्येक भविष्यवादी तंत्रज्ञानामध्ये स्पिन-ऑफ ऍप्लिकेशन्स क्षमता असतात आणि ते प्रत्येक नागरिकाच्या जीवनाला स्पर्श करणाऱ्या प्रमुख सरकारी कार्यक्रम आणि केंद्रीत क्षेत्रांमध्ये लागू कर