दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा. दवणे.. मंठा..नगरसेवक चषक क्रिकेट स्पर्धा मंगेशकरांच्या मनोरंजनासाठी नगरसेवक प्रदिप भैय्या बोराडे यांच्या संकल्पनेमधून एकुण दहा संघ लिग मॅचेस मागील पंधरा ते वीस दिवसांपासून मनोरंजन करत असताना सहभागी संघ संग्राम फाइटर, मेट्रो इलेव्हन, रेणुका इलेव्हन, भगतसिंग हिरोजी, पृथ्वीराज फायटर, अरसलान टायगर, असिम राईडर,कपिल इलेव्हन, अल्फैज इलेव्हन आणि ऋतुजा रायगड या दहा संघाचा समावेश लीग मॅचेस मध्ये होता.
आयपीएल चषकाचे उद्घाटन शिवसेना जिल्हाप्रमुख ए.जे पाटील बोराडे यांच्या हस्ते करण्यात आले असताना. मागील दोन दिवसापासून लीग मॅचेस चे रूपांतर क्वालिफाय राऊंड आणि अंतिम सामन्याकडे सर्वांचे लक्ष होते. ऋतुजा रायडरने असीम रायडरला उपांत्यपूर्व फेरीमध्ये नमवून अंतिम सामन्यांमध्ये प्रवेश केला. तर संग्राम फायटरने कडवी झुंज देत अरसलान टायगर आणि असीम रायडरला नमवत अंतिम सामन्या ऋतुजा रायडर व संग्राम मध्ये झाला असताना या सामन्याचा आनंद घेण्यासाठी ए.जे.बोराडे, अजयभैय्या अवचार,जे.के.कुरेशी, बाळासाहेब बोराडे, प्रदीप भैय्या बोराडे, संतोष वरकड, श्रीरंगअण्णा खरात,शे.एजाजभाई, संजय बोराडे,रविमामा काळे भगतसिंह टिम सर्व सपोटर यांची उपस्थिती होती सामन्याचे दृश्य टिपण्यासाठी होती.अंतिम सामन्यांमध्ये ऋतुजा रायडरने विजय बोराडे यांच्या अष्टपैलू खेळाच्या बळावर १२२ धावांचा विशाल धावफलक ठेवला असता पाठलाग करताना संग्राम फायटर झुंज देता देता अपयशी ठरली.
उत्कृष्ट पंच उपसर्ग पठाण उत्कृष्ट समालोचक कय्युम कुरेशी, शेख परवेज, जुनेद पठाण यांच्यासह उत्कृष्ट गोलंदाज शेख.अन्नू, उत्कृष्ट फलंदाज इम्रान पठाण, उत्कृष्ट खेळाडू इम्रान बागवान, मॅन ऑफ द सिरीज विजय बोराडे यांना जिल्हा प्रमुख बोराडे हस्ते सन्मानित करण्यात आले.
(एम पी एल नगरसेवक चषकाला क्रिकेट संघासह सर्वच खेळाडूचे आभार मानत नगरसेवक प्रदीप बोराडे रसिकांच्या मनोरंजनाकरिता वारंवार स्पर्धेचे आयोजन करून मंठा शहर तालुक्यातील खेळाडू महाराष्ट्र देशामध्ये किर्तीवंत होण्यासाठी केलेला हा क्रिकेटचा छोटासा प्रयोग युवकाच्या गुणवत्तेला हातभार लावणारा ठरेल.नगरसेवक प्रदीप भैय्या साहेब)..
(ऋतुजा रायडर्स सारनाथ युथ संघटनेवर नविन आशा, स्वप्न मनामध्ये घेऊन मैदानावर उतरली असता. सुरुवातीचे सामने जड गेली मात्र हळूहळू कासवाच्या गतीने एन.पी.एल चषकाचे आम्ही मानकरी ठरलो. याचे सर्व श्रेय खेळाडूंना देत, सिंहाचा वाटा विजय बोराडे यांच्या अष्टपैलू कामगिरीवर ऋतुजा रायडर हा संघ विजयी ठरला. संघऑनर राहुल खरात)