दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी- नवनाथ यादव
भूम: शहरातील श्री गुरुदेव दत्त हायस्कूल येथे इयत्ता नववीत शिकणारा पार्थ सचिन बोंडगे या विद्यार्थ्याने उस्मानाबाद येथील विद्यामाता हायस्कूल येथे खाऱ्या पाण्यापासून पिण्यायोग्य पाणी तयार करण्याचा प्रयोग सादर केला. हा प्रयोग त्यांनी विज्ञान शिक्षक संतोष राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सादर केला .त्यांच्या या यशाबद्दल विकासरत्न माजी नगराध्यक्ष संजय गाढवे यांच्या हस्ते विद्यार्थी ,मार्गदर्शक शिक्षक, पालक यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी नगरसेवक किरण जाधव , बाळासाहेब भोरे , वस्ताद मामू जमादार , रामभाऊ बागडे , प्रदीप कांबळे , विठ्ठल कोळी जितेंद्र म्हेत्रे , पालक सचिन बोंडगे यांच्यासह शिक्षक व पदाधिकारी उपस्थित होते.या प्रयोगाच्या यशस्वी सादरीकरणामुळे येणाऱ्या काळामध्ये पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात सुटण्यास मदत होणार आहे .या प्रयोगामध्ये समुद्राच्या पाण्यामध्ये असलेले क्षार काढून टाकून निव्वळ सूर्य ऊर्जेच्या साह्याने ते पाणी शुद्ध कसे बनवावे यावर या प्रयोगामध्ये मांडणी केलेली आहे . या प्रयोगाची पाहणी लातूर विभागाचे उपसंचालक गणपत मोरे शिक्षणाधिकारी गजानन सुसर उपशिक्षणाधिकारी मिरगणे,विज्ञान पर्यवेक्षक काझी त्यांच्यासह मान्यवर परीक्षक यांनी केली. या यशाबद्दल राज्यस्तरावर निवड केली. ग्रामीण भागात सह तालुक्यातील सर्व स्तरातून पार्थ चे कौतुक होत आहे.