दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी संभाजीनगर -शितल रमेश पंडोरे
———————————-
संभाजीनगर- दि. 31 जानेवारी2023 वाल्मी कार्यालयातर्गत कामे मंजूर करण्यासाठी कॉन्ट्रॅक्टरच्या मित्राकडून30 हजारांची लाच घेताना वाल्मी चे लेखाधिकारी यांच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले.
प्रदीप प्रल्हाद बाहेकर(वय 47वर्ष,पद-लेखा अधिकारी अतिरिक्त कार्यभार प्रशासकीय अधिकारी वाल्मी कार्यालय संभाजीनगर(वर्ग-2)व मोहन दशरथ शेलार(वय52वर्ष रा. व्हिजन सिटी औरंगाबाद, पद-लेखाधिकारी वर्ग-2वाल्मी औरंगाबाद)अशी आरोपी चे नाव आहेत.
एकूण 1150000/-रुपयाचे काम मंजूर केले म्हणून व आणखी 890000/- काम मंजूर करण्यासाठी टक्के वारीप्रमाणे एकूण 30000/- हजारांची तक्रारदार यांच्या कडे पंचा समक्ष प्रदीप बाहेकर यांनी मागणी करून सापळा कारवाई दरम्यान लाचेची रक्कम मोहन शेलार यांनी स्वीकारली.
ही कारवाई संदीप आटोळे ,पोलीस अधीक्षक,यांच्या मार्गदर्शनाखाली विशाल खांबे अपर पोलीस अधीक्षक ,मारुती पंडित पोलीस उप अधीक्षक ,सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक हनुमंत वारे सापळा पथक – पो.ना सुनील पाटील ,पो.ना साईनाथ तोडकर ,पो .ना विलास चव्हाण यांनी पार पडली