
दैनिक चालू वार्ता
हदगाव तालुका प्रतिनिधी ÷ सचिन मुगटकर
ग्रामीण भागातील लोकांचे कामे ग्रामपंचायत मध्ये करावे व ग्रामपंचायत मध्ये सी.सी.टी.व्ही. कॅमेरे व त्यांच्या उपस्थिती बघण्यासाठी थमची व्यवस्था करावी या मागणीसाठी दि.१७नोव्होंबर रोजी तहसील कार्यालय हदगाव, गट विकास अधिकारी हदगांव उपविभागीय अधिकारी हदगांव यांना निवेदन देण्यात आले
महिला बचत गटातील महिलांना अनेक योजनाची माहिती मार्गदर्शन मिळत नाहीत व गावावर कर्मचारी वर्गसुद्धा येत नाहीत त्यासाठी गाव पातळीवरील जनतेच्या सेवेसाठी शासन बरेच कर्मचान्यांची निवड केलेली असते हे कर्मचारी गाव पातळीवर काम करत असतात. पण त्यातील मोजकेच कर्मचारी हे तालुक्याच्या ठिकाणावरून कामे करत असतात तर काही कर्मचारी हे गावातील एखादया प्रतिष्ठीत व्यक्तीला हाताशी धरून कधीतरी गाव उतळीवर येत असतो. मुळात सांगायचे म्हणजे की, गाव पातळीवर किती कर्मचारी आहेत व त्यांची कामे काय काय आहेत
शासनाने त्यांना गावपातळीवर जनतेला येणाऱ्या समस्याचे निवारण, मदत किंवा योग्य मार्गदर्शन करण्यासाठी त्यांची नेमणूक केली जाते. पण गावातील लोकांना आपल्या येथे शासनाने किती कर्मचारी दिलेत हेच माहिती नसल्याने बरेच कर्मचारी हे फक्त पगारी उचलने व त्या गावात फेरफटका किंवा पाहुण्याकडे आलो असे दाखवता व निघून जातात. हे सर्वत्र होत असते त्यांना ते कोण आहेत? व त्यांचे कोणते कामे आहेत? हे माहित नसल्यामुळे त्याकरीता मा. गटविकास अधिकारी साहेब मा.तहसिलदार साहेब यांनी विशेष लक्ष देवून गाव पातळीवरील सर्व कर्मचारी जसे की कृषी सहाय्यक, लाईनमेन, आरोग्य सेवक, आरोग्य डॉक्टर, पशुवैद्यकिय अधिकारी, आरोग्य ग्रामसेवक, ऑपरेटर, रोजगारसेवक, पोष्टमेन, आशा वर्कर्स अशा प्रकारचे सर्व कर्मचारी आठवडयातून एक दिवस आपआपल्या ग्रामपंचायतमध्ये उपस्थितीत देवून त्याच ठिकाणी गावकऱ्याची कामे सी.सी.टी.च्या नजरे समोर करण्यात यावे.
कर्मचाऱ्यांनी सुध्दा ठरवलेल्या दिवशी हजर राहून कामे करावीत व लोकांना सहकार्य करावे असे निवेदनात म्हटले आहे.
वरील सर्व कर्मचारी कोणत्या दिवशी कोणाची कुठे डयूटी आहे याची यादी बनवावी व त्याची यादी व फोननंबरची प्रत बचत गटातील महिलांना देण्यात यावी. व एक प्रत ग्रामपंचायतला देण्यात यावी.
हे सर्व प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावी जर ही प्रक्रिया पूर्ण नाही झाल्यास संपूर्ण हदगांव तालुक्यातील हजारो बचत गटातील महिला बचत गटातील पदाधिकारी महिला हदगाव तहसील कार्यालया समोर अमरण उपोषणास बघणार आहोत असा इशारा महिला बचत गटातील अध्यक्ष आकांक्षा वायवळ हदगांव यांनी दिला यावेळी हदगाव तालुक्यातील शेकडो महिला उपस्थित होत्या