दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा. दवणे..
मंठा..मागील काळात भाषचा शोध लागण्यापूर्वी मानव चित्रे, विशिष्ट
आवाज, खाणाखुणा याच्या माध्यमातून संवाद साधत होता. पण आजच्या डिजिटल युगात जगाची भाषा बदलत आहे. जणू डिजिटल माध्यमातून माणसाच्या भावना व्यक्त करण्याचा माध्यमांचा उलटा प्रवासच सुरू झाला आहे.
इमोजीच्या रूपाने चिन्हांचा
शब्द, अक्षरांबरोबरच आता नवनवीन जी. आय.एफ, बीटमोजी, कार्टून स्टिकरस्, माय स्टिकरस्, दिवसेंदिवस जास्त प्रमाणात वापर सुरू झालेला आहे. विशेष म्हणजे, ही , इमोजींची भाषा जागतिक असून त्याचे संकेत लहानांपासून थोरांपर्यंत सर्वाना माहिती आहेत. सोशल मीडियाचा वापर करतांना विशेष करून मोबाईलवर हल्ली नवनवीन फिचरस् बघायला मिळत आहेत. त्यामुळे आपल्या मनातील भावना व्यक्त करतांना या फिचरसूचा सर्रास वापर केला जातो. जेणेकरून त्यांच्या मनातील भावना या समोरील व्यक्तीला प्रत्यक्षात न बोलता या इमोजींद्वारे कळविण्यात येते.
सोशल मीडियावर हात चालताना नकळत हीच भाषा बोलली जाते. खरे तर, यामुळे वेळही वाचतो आणि मनातील नेमक्या भावना समोरच्यापर्यंत पोहोचवता येतात असे म्हणतात. त्यामुळे इमोजीची भाषा समजायला आणि उमजायला कुणालाही वेळ लागला नाही. काही कालावधीतच ही भाषा सर्वांना अवगत झाली आहे.