
दै.चालू वार्ता
प्रतिनिधी :केंद्रे प्रकाश
पुणे चिंचवड़ :- महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगाच्या अध्यक्ष पदाच्या नेमणूक करण्याची मागणी अपना वतन संघटनेचे अध्यक्ष सिद्दिकभाई शेख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ,अल्पसंख्यक मंत्री नवाब मलिक, अल्पसंख्यक राज्यमंत्री डॉ.विश्वजित कदम यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. महाराष्ट्र राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येऊन दोन वर्ष झाली आहेत.
महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण लोकसंख्येच्या तुलनेत जवळजवळ २५ टक्के लोकसंख्या अल्पसंख्यांक समाजाची आहे. यामध्ये मुस्लिम, ख्रिश्चन , शीख बौद्ध ,पारशी ,जैन यांचा समावेश होतो. भारतीय अल्पसंख्यांक समाजाच्या शैक्षणिक ,आर्थिक ,सामाजिक ,राजकीय ,सांस्कृतिक क्षेत्रातील मागासलेपणा दूर करण्यासाठी भारतीय संविधानातील तरतुदीनुसार अल्पसंख्यांक आयोगाची स्थापना करण्यात आली.
परंतु हा अल्पसंख्यांक आयोग नावापुरताच राहिला आहे काय अशी भावना समाजाची झाली आहे. कारण मागील दोन वर्षांमध्ये महाविकास आघाडी सरकारला महाराष्ट्र राज्यामध्ये अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्ष नेमता