
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी पुणे शहर (पुणे जिल्हा )
गुणाजी मोरे
वडगावशेरी मतदार संघातील प्रभाग क्र 5 च्या महिला आघाडी अध्यक्षा श्वेताताई गलांडे यांनी ‘ श्वेतायन ‘ कार्यभरारी वर्षपूर्तीची व दिवाळी फराळ स्नेहमिलन या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
यावेळी मा. आ. व भाजप अध्यक्ष पुणे शहर मा. आ. जगदीश मुळीक कार्यक्रमाला उपस्थित राहून श्वेताताई गलांडे यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी जगदीश मुळीक यांच्या सह नगरसेवक योगेश मुळीक, निवृत्तीआप्पा गलांडे,नगरसेविका शितल शिंदे, अर्जुन जगताप, ज्ञानेश्वर शिंदे, राजू घुले,संतोष गलांडे, मुकुंद गलांडे, श्वेता गलांडे, गणेश देवकर, संतोष घोलप यांच्यासह पदाधिकारी व स्थानिक उपस्थित होते.