
दैनिक चालू वार्ता
देगलूर प्रतिनिधी संतोष मंनधरणे.
देगलूर-
शेती मालाचे वाहतूक असो वा पेरणी मशागतीचे साधने शेताकडे नेणे आणणे असो.., या सगळ्या गोष्टीसाठी पाणंद रस्ते होणे आता शेतीची खरी गरज बनली आहे. ही गरज ओळखून चाकूर येथील शेतकरी संघटीत होऊन मागील एक महिन्यापासून त्यासाठी धडपड करत होती. गावातील काही तरूण शेतकऱ्यांनी प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका प्रमुख व शेतकरी नेते कैलास येसगे कावळगावकर यांच्याशी संपर्क केल्यानंतर त्यांनी यासाठी आवश्यक ती प्रक्रिया तरूण शेतकऱ्यांना समजावून सांगितल्यानंतर गावातील सरपंच, उपसरपंच, लहान मोठे सर्व शेतकरी एकत्र येत एकमुखाने ग्राम पंचायतीचा ठराव व सर्व शेतकऱ्यांची सहमती घेऊन चाकूरचा पाणंद रस्ता तात्काळ मोकळा करून पालकमंत्री पाणंद रस्ते योजना वा मातोश्री योजने अंतर्गत या पाणंद रस्त्याचे काम तात्काळ करून द्यावे अशा मागणीचे निवेदन उपविभागीय अधिकारी मा. शक्ती कदम, तहसीलदार मा. राजाभाऊ कदम, गटविकास अधिकारी यांची भेट घेऊन, विस्तृत चर्चा करून दिले. मा. तहसीलदार राजाभाऊ कदम याबाबत पुढाकार घेत पाणंद रस्ता मोकळा करून देऊन काम लवकरात लवकर मार्गी लावण्याचा शब्द याप्रसंगी उपस्थित शेतकऱ्यांना दिला.
याप्रसंगी राष्ट्रवादीचे तालुका प्रमुख अँड. अंकूश देसाई देगावकर, प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका प्रमुख कैलास येसगे कावळगावकर यांनी संबधीत अधिकाऱ्यांना या कामाची आवश्यकता लक्षात आणून दिली. यावेळी तलाठी जांबळे साहेब, ग्रामसेवक शिरसे साहेब, गावातील प्रमुख शेतकरी रावसाहेब बिरादार, भगवान बिरादार, माधवराव निलंगे, कामाजी बिरादार, गंगाधर बिरादार, संदीप निलंगे पाटील, सरपंच पांडूरंग राजूरे, सहदेव बिरादार, राजेंद्र बाबुराव बिरादार, हणमंत बिरादार, माधवराव बिरादार, बालाजी बिरादार, बाबुराव बिरादार, लक्ष्मन बिरादार, गंगाधर बिरादार, कामाजी गणपतराव बिरादार, देवराव भिलोंडे, गणेश बिरादार, श्रीनिवास बिरादार, पंढरी बिरादार, रामराव आवळे, दत्ताजी गाडले, संतोष वाडीकर, गोविंद भुरे, दादाराव पांडवे, इरबा भुरे, यादव पांडवे, भीमराव भुरे व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.