दैनिक चालु वार्ता उस्माननगर प्रतिनिधी -लक्ष्मण कांबळे
नांदेड/ नांदेड : – येथील महात्मा फुले हायस्कूल नाईक नगर च्या शाळेतील विद्यार्थ्यांची एक दिवसीय शैक्षणिक सहल भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना येळेगाव परिसरातील निसर्ग सौंदर्य व परिसरातील भौगोलिक परिस्थिती चा प्रत्यक्ष अनुभव घेऊन अभ्यास करावा हा उद्देश ठेवून शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले. शाळेतील इयत्ता ५ वी ते ९ वी इयत्तेतील विद्यार्थ्यी ,विद्यार्थ्यीनी सहभागी झाले. ऊसा पासुन साखर कशी तयार केली जाते याबाबत कारखान्यातील प्रशासनाकडून विद्यार्थ्यांना माहीती देण्यात आली. शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष श्री आमोलभाऊ केंद्रे शाळेतील मुख्याध्यापक श्री भारत कलवले यांच्या उपस्थितीत सहलीस प्रारंभ करण्यात करण्यात आले.
शैक्षणिक सहल यशस्वी करण्यासाठी शाळेतील जेष्ठ शिक्षक श्री एन.पी.केंद्रे ,श्री व्ही.एम.खवास पाटील श्री एस.पी.डांगे ,सौ.ए.व्ही.रामगीरवार मॅडम, श्री रामदास उदगीरवाड यांनी विशेष परिश्रम घेतले.