दैनिक चालु वार्ता जव्हार प्रतिनिधी-दिपक काकरा.
पालघर/जव्हार:जिल्हा परिषदेच्या जि.प शाळा हाडे व ग्रामपंचायत कासटवाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने ४ फेब्रुवारीला शाळेच्या प्रणांगणात ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच कल्पेश राऊत यांच्या उपस्थितीत सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.इयत्ता पहिली ते दहावी पर्यंतचे वर्ग असलेल्या या शाळेतील विद्यार्थ्यांनी या सांस्कृतिक कार्यक्रमात उस्फूर्तपणे सहभाग घेऊन आपल्या अंगी असलेल्या कला व गुणांचे दर्शन उपस्थित प्रेक्षकांना करून दिले.बालकलाकारांनी उत्तमरीत्या विविध पोशाखात अनेक प्रकारच्या गाण्यांवर ठेका धरून प्रेक्षकांचे मनोरंजन केले.
या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समिती,स्थानिक शिक्षक आणि कासटवाडी ग्रामपंचायतच्या माध्यमातून एकत्रित रित्या उत्तम नियोजन करून बाल कलाकारांना एक मोठे कला मंच उपलब्ध करून दिले होते.या सांस्कृतिक कार्यक्रमात जव्हार पं.स.माजी उपसभापती सिताराम पागी,माजी सदस्य विनायक राऊत,ग्रामपंचायतीच्या उपसरपंच सुलोचना चौधरी,सदस्य कल्याणी राऊत,राजश्री टोकरे,मोनिका खिरारी,बाळू भोये,कुणाल सापटा,नितीन टोकरे,त्रंबक रावते तसेच शेकडो स्थानिक ग्रामस्थ आजूबाजूच्या पड्यातील नागरिक उपस्थित झाले होते.